विश्वचषक 2023 स्पर्धेचा महाकुंभमेळा भारतात आयोजित केला जाणार आहे. ही स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण 10 संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. प्रत्येक संघ आपल्या खेळाडूंना या स्पर्धेसाठी तयार करत आहे आणि त्यांना फिट बनवत आहे. माजी खेळाडू आपल्या आवडत्या संघ आणि खेळाडूंबाबत वेगवेगळी मते मांडत आहेत. अशातच वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज फलंदाज सर विवियन रिचर्ड्स यांनी भविष्यवाणी केली आहे. रिचर्ड्स यांनी विश्वचषक 2023 स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाचे नाव सांगितले आहे.
कोण घेणार विश्वचषक 2023मध्ये सर्वाधिक विकेट्स?
महान फलंदाजांमध्ये गणले जाणारे विवियन रिचर्ड्स (Vivian Richards) यांनी विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेविषयी आयसीसीशी संवाद साधला. यादरम्यान त्यांच्यासोबत दक्षिण आफ्रिकन दिग्गज जॅक कॅलिस आणि भारतीय दिग्गज वीरेंद्र सेहवाग होते. या चर्चेदरम्यान रिचर्ड्स यांना विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाविषयी विचारले गेले, तेव्हा त्यांनी शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याचे नाव घेतले.
काय म्हणाले रिचर्ड्स?
ज्यावेळी रिचर्ड्स यांना विचारले गेले की, विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज कोण असेल? यावेळी त्यांनी पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) याचे नाव घेतले. ते म्हणाले, “विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज शाहीन आफ्रिदी असेल. मी त्याला पाकिस्तानमध्ये पाहिले आहे. मी पीएसएलमध्ये काही वेळ घालवला आहे. मी त्याचा मोठ्या प्रमाणात विकास पाहिला आहे. तो खूप चांगला आहे आणि एक दृढ निश्चयी व्यक्ती आहे.”
Viv Richards picks Shaheen Shah Afridi as the leading wicket-taker in World Cup 2023. [ICC] pic.twitter.com/AhSsUfoPrc
— Johns. (@CricCrazyJohns) August 29, 2023
शाहीनव्यतिरिक्त या गोलंदाजांचेही घेतले नाव
रिचर्ड्स यांनी विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये शाहीनव्यतिरिक्त भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट, अफगाणिस्तानचा राशिद खान आणि ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार यांचे नाव घेतले. मात्र, रिचर्ड्स यांची पहिली पसंती आफ्रिदीलाच राहिली.
यामागील कारण म्हणजे, स्पर्धा भारतात खेळली जाणार आहे. तसेच, आफ्रिदी शानदार गोलंदाजी करेल. कारण, त्याला उपखंडातील खेळपट्ट्यांवर खेळण्याचा खूप फायदा होईल. आफ्रिदीच्या वनडे कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 39 वनडे सामन्यात 23.34च्या सरासरीने आणि 5.42च्या इकॉनॉमी रेटने 76 विकेट्स घेतल्या आहेत. आता रिचर्ड्स यांची भविष्यवाणी आफ्रिदी योग्य ठरवतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (west indies legend batsman vivian richards picks this cricketer as the highest wicket taker in world cup 2023)
हेही वाचलंच पाहिजे-
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेले ‘हे’ 3 पाकिस्तानी खेळाडू Asia Cup 2023मध्ये भारतासाठी ठरू शकतात मोठा धोका, वाचा
ट्रॉफी जिंकण्याविषयी विराटचे रोखठोक भाष्य; म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगतो, मला…’