---Advertisement---

पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचे दुसऱ्या टी२०मध्ये दमदार पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्ध मिळवला दणदणीत विजय

On: सोमवार, जून 28, 2021 11:45 AM
---Advertisement---

सध्या दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेदरम्यान पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दक्षिण आफ्रिका संघाने दुसऱ्या सामन्यात शानदार पुनरागमन करत हा सामना 16 धावांनी जिंकला. त्यामुळे मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे.

पहिल्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने वेस्टइंडीज संघाला 161 धावांचे लक्ष्य दिले होते. वेस्टइंडीज संघाने 15 षटकांमध्ये हे लक्ष पार केले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करताना 167 धावा बनविल्या. यामध्ये वेस्टइंडीज संघाला 16 धावांनी पराभव पत्करावा लागला.

वेस्ट इंडिज फलंदाजी करत असताना मधल्या षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत दक्षिण आफ्रिका संघाला विजयाचे दावेदार बनविले. जॉर्ज लींडने 19 धावा देत 2 बळी घेतले आणि सामनावीराचा किताब मिळवला. वेस्ट इंडिजकडून या सामन्यात फॅबियन एलेनने 12 चेंडूंमध्ये 34 धावा केल्या. यामध्ये 5 षटकारांचा समावेश आहे.

वेस्ट इंडिज संघाने बनवलेल्या 150 धावा

पहिल्यांदा फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 7 बाद 166 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देत वेस्ट इंडिज संघाला 20 षटकामध्ये 9 बळी गमावत 150 धावाच करता आल्या. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाला 16 धावांनी पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिका संघाकडून कर्णधार टेंबा बावूमाने सर्वाधिक 33 चेंडूंमध्ये 46 धावा केल्या. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 1 षटकार मारले. तसेच रिजा हेनरिक्‍सने 30 चेंडूमध्ये 42 धावा केल्या. तर वेस्ट इंडिज संघाचा गोलंदाज ओबैद मॅकॉयने 25 धावा देत 3 बळी घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 167 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाकडून आंद्रे फ्लेचरने 35 धावा केल्या. संघाचे स्टार खेळाडू या सामन्यात अपयशी ठरले. ख्रिस गेलने 8 धावा तर कर्णधार कायरन पोलार्डने 1 आणि आंद्रे रसलने 5 तर ड्वेन ब्रावोने 10 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडा 37 धावांमध्ये तीन बळी घेतले.

महत्त्वाच्या बातम्या – 

सतत फ्लॉप ठरत असलेल्या श्रीलंकन क्रिकेटपटूंवर चाहत्यांचा संताप; उचलले ‘हे’ मोठे पाऊल

अमेरिकेचा ‘हा’ धावपटू भविष्यातील ‘वेगाचा बादशाह’? वयाच्या १७ व्या वर्षी मोडलाय उसेन बोल्टचा विक्रम

भारतीय संघासाठी टी२० क्रिकेटच्या बाबतीत श्रीलंकेचा दौरा अगदी सोपा; पाहा ‘ही’ आकडेवारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---