वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडेन सीलला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) फटकारले आहे. किंग्स्टनमध्ये पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात त्याने हसन अलीविरुद्ध अपशब्द वापरले. ही घटना पाकिस्तानच्या डावाच्या ७० व्या षटकात घडली.
आयसीसीने हे कृत्य भडकवणारे आणि आचारसंहितेच्या लेव्हल -१ चे उल्लंघन मानले आहे. सीलच्या अनुशासनात्मक रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट देखील जोडला गेला आहे. त्याचा २४ महिन्यांच्या कालावधीतील हा पहिला गुन्हा होता.
सीलने आपली चूक मान्य केली आहे आणि सामनाधिकाऱ्यांनी केलेली कारवाई स्वीकारली. म्हणून या प्रकरणाची स्वतंत्र औपचारिक सुनावणी होणार नाही. त्याच्यावर मैदानातील पंच ग्रेगरी ब्रेथवेट, जोएल विल्सन आणि टीव्ही पंच लेस्ली रेफर यांनी आरोप केले होते.
आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल -१ चे उल्लंघन केल्यास खेळाडूला कमीतकमी फटकार आणि त्याच्या मॅच फीच्या जास्तीत जास्त ५० टक्के कपात होऊ शकते. या व्यतिरिक्त, त्याच्या खात्यात एक किंवा दोन डिमेरिट पॉइंट देखील जोडले जाऊ शकतात. जर २४ महिन्यांच्या आत एखाद्या खेळाडूच्या खात्यात ४ किंवा अधिक डिमेरिट पॉइंट जोडले गेले तर ते निलंबन गुण बनतात आणि असे दोन गुण झाल्यास १ कसोटी किंवा २ एकदिवसीय किंवा २ टी-२० जे आधी येईल त्यातून खेळाडूला निलंबित केले जाते
दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी १६८ धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात २१७ धावा केल्या होत्या. त्यानंतर वेस्ट इंडिजने पहिल्या डावात २५३ धावा करत ३६ धावांची आघाडी मिळवली होती. दुसऱ्या डावात पाकिस्तानने २०३ धावा केल्या आणि वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी १६८ धावांचे आव्हान ठेवले.
महत्त्वाच्या बातम्या –
राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये ‘या’ देशाचा संघ करणार वेस्ट इंडिज क्रिकेटचे प्रतिनिधित्व
‘हे क्रिकेटचे पीच आहे, तुमच्या घराचे अंगण नाही’, अँडरसनवर भडकला कर्णधार कोहली
अँडरसनला बाउंसर टाकलेले पाहून डेल स्टेन म्हणाला, “बुमराह जेव्हा फलंदाजीला येईल तेव्हा…”