---Advertisement---

थेट अंपायरलाच दिल्या शिव्या, आयसीसीने केली मोठी कारवाई!

On: मंगळवार, डिसेंबर 10, 2024 8:26 PM
---Advertisement---

वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफला (Alzarri Joseph) आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्याला मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. हे प्रकरण वेस्ट इंडिज विरूद्ध बांगलादेश (West Indies vs Bangladesh) संघातील पहिल्या वनडे सामन्याशी संबंधित आहे. ज्यामध्ये जोसेफ अपमानास्पद भाषा वापरताना आढळला होता. तो नियमांच्या कलम 2.3 मध्ये दोषी आढळला आहे. ज्या अंतर्गत कोणत्याही खेळाडूला मैदानावर अश्लील भाषा वापरण्याची परवानगी नाही.

अल्झारी जोसेफला (Alzarri Joseph) मॅच फीमध्ये कपात करण्यासोबतच त्याला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. सामना सुरू होण्यापूर्वी जोसेफचा चौथ्या अंपायरशी वाद झाला, तेव्हा ही घटना घडली. खरेतर, सामना सुरू होण्यापूर्वी अंपायरनी जोसेफला स्पाइक असलेले शूज घालून खेळपट्टीवर न जाण्यास सांगितले होते. दरम्यान, त्याने अंपायरला शिवीगाळ करत अपशब्दही वापरले. जोसेफने स्वत: हे आरोप मान्य केले आहेत.

अल्झारी जोसेफवर हे आरोप ग्राउंड अंपायर कुमार धर्मसेना, लेस्ली रेफर, थर्ड अंपायर आसिफ याकूब आणि चौथे अंपायर ग्रेगरी ब्रॅथवेट यांनी मॅचदरम्यान लावले होते.

लेव्हल 1 मधील नियमांचे उल्लंघन केल्यास, कमीत कमी शिक्षा फटकारली जाऊ शकते आणि जास्तीत जास्त शिक्षा मॅच फीच्या 50 टक्के दंड असू शकते. यासोबतच 1 किंवा 2 डिमेरिट पॉइंट्सही दिले जाऊ शकतात. या घटनेमुळे जोसेफ प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. पण त्याच्या कामगिरीवर फारसा परिणाम झाला नाही.

पहिल्या वनडे सामन्यात त्याने 10 षटकात 67 धावा दिल्या आणि 2 विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजने (West Indies) हा सामना 5 विकेट्सने जिंकला, ज्यामध्ये शेरफेन रदरफोर्डने (Sherfane Rutherford) 7 चौकारांसह 8 षटकार ठोकले होते. दरम्यान त्याने 113 धावांची शानदार खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

वनडे क्रमवारीत आफ्रिकन खेळाडूचा जलवा, तर भारतीय खेळाडूंना बसला फटका
SFA चॅम्पियनशिप 2024 मुंबई: निर्वाण कैस्थ, आरुष गोरे, साची नागोटकर यांना सुवर्णपदक
IPL; सध्याचे 3 आयपीएल कर्णधार! ज्यांनी जिंकले सर्वाधिक सामने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---