---Advertisement---

कॅरिबियन खेळाडूंची बातच काही और! फलंदाजाला बाद केल्यानंतरचे ‘बुलेट’ सेलिब्रेशन व्हायरल

On: बुधवार, जानेवारी 19, 2022 4:54 PM
Onaje Amory celebration
---Advertisement---

वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक (icc under 19 world cup) स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळत आहे. सोमवारी (१७ जानेवारी) या स्पर्धेत वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलॅंड (West Indies vs Scotland) हे दोन्ही संघ आमने-सामने होते. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने स्कॉटलॅंड संघावर ७ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाकडून ३ गडी बाद करणाऱ्या शिव शंकरची (Shiv shankar) सामनावीर म्हणून निवड करण्यात आली होती. दरम्यान, या सामन्यात गडी बाद केल्यानंतर वेस्ट इंडीजच्या एका खेळाडूने असे काही सेलिब्रेशन केले होते. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

वेस्ट इंडिज संघातील खेळाडू मनमोकळ्या स्वभावाचे असतात, हे नेहमीच पाहायला मिळाले आहे. वरिष्ठ खेळाडू असो किंवा युवा खेळाडू, हे खेळाडू आपल्या हटके अंदाजमुळे नेहमीच चाहत्यांची मने जिंकत असतात. जेव्हा हे खेळाडू गडी बाद करतात, झेल टिपतात किंवा शतक पूर्ण करतात त्यावेळी हे खेळाडू हटके सेलिब्रेशन करताना दिसून येत असतात. हेच हटके सेलिब्रेशन १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत देखील पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

तर झाले असे की, स्कॉटलॅंड संघाची फलंदाजी सुरू असताना ओनाजे अमोरी (onaje Amory) गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याने टाकलेल्या चेंडूवर स्कॉटलॅंड संघाचा कर्णधार चार्ली पिट स्लीपमध्ये असलेल्या टेडी बिशपकडून झेल बाद झाला. हा झेल पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. (Onaje Amory celebration)

टेडी बिशपने स्लीपमध्ये हा कठीण झेल टीपताच गोलंदाज, ओनाजे अमोरी भलताच खुश झाला होता. ओनाजे अमोरीने बंदूकीने गोळी मारण्याचा इशारा करत सेलिब्रेशन केले. हे पाहून असे वाटत होते की, तो हातानेच गोळी मारण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

https://twitter.com/ICC/status/1483405237385838596

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर स्कॉटलॅंड संघाने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या ९५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाने १९.४ षटकात ३ फलंदाज गमावून हे लक्ष्य पूर्ण केले.

महत्वाच्या बातम्या :

लखनऊ फ्रेंचायझींंने दिला आश्चर्याचा धक्का! राहुलसह दोन अनपेक्षित नावांवर लागली मोहर

केव्हा, कुठे आणि कधी पाहू शकाल भारत-दक्षिण आफ्रिका पहिली वनडे? जाणून घ्या एका क्लिकवर

हे नक्की पाहा:

सचिन-कांबळीच्या करामतीने गांगुलीच्या रुममध्ये झालेलं पाणीच पाणी| Sachin-Kambli Prank on Ganguly

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---