दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गमावल्यानंतर भारत आता वेस्ट इंडीजविरुद्ध टी२० आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ६ फेब्रुवारीला भारतातील अहमदाबाद येथे पहिला सामना खेळला जाणार असून वेस्ट इंडीज संघ भारत दौऱ्यावर असणार आहे. ज्यासाठी या आठवड्यात भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेतील खराब खेळीमुळे आता वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघात बदल केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या संघात भारताच्या या तीन मजबुत आणि दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. भारताने दक्षिण आफ्रीका दौऱ्यावर कसोटी आणि एकदिवसीय या दोन्ही मालिका गमावल्या आहेत. या पराभवातून बाहेर पडण्यासाठी भारतात खेळल्या जाणाऱ्या ३ एकदिवसीय आणि ३ टी २० मालिकांमध्ये भारत जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाचा नवीन कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन ६ फेब्रुवारीला खेळल्या जाणाऱ्या भारत आणि वेस्ट इंडीजच्या सामन्यात होण्याची शक्यता आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध कोणते तीन खेळाडू पुनरागमन करू शकतात, हे या लेखातून पाहू.
१. रोहित शर्मा
भारतीय संघाच्या नवीन कर्णधार म्हणजेच रोहित शर्मा संघात पुनरागमन करु शकतो. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दिसणारा हा सर्वात मोठा बदल आहे. रोहित शर्मा हा भारतीय संघाचा स्टार फलंदाज आहे, तो संघात असणे खूप महत्त्वाचे असणार आहे. रोहित शर्मा हॅमस्ट्रींगच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रीकेविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत खेळला नव्हता.
आता भारतीय कर्णधार वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यांत खेळताना दिसण्याची अपेक्षा आहे. रोहित शर्माशिवाय संघाची फलंदाजी कमकुवत जाणवली होती. त्यामुळे त्याचे पुनरागमन संघाच्या फलंदाजीला बळकटी देणारे ठरणार आहे.
२.रवींद्र जडेजा
६ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या मालिकेत भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजाचे संघात पुनरागमन होऊ शकते. तो संघात असल्याने संघाला समतोल मिळू शकतो. कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी अनेक बदल करण्यात आले, परंतु, त्याच्या जागी एकही फलंदाज बसू शकला नाही.
दुखापतीतून सावरल्यानंतर रवींद्र जडेजा वेस्ट इंडीजविरुद्ध जोरदार पुनरागमन करू शकतो. त्याअगोदर भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला होता की, “संघाची लय संतुलनावर अवलंबून आहे. संघाचा समतोल साधणारे आणि सहाव्या, सातव्या, आठव्या क्रमांकावर अष्टपैलू म्हणून पर्यायी खेळाडू निवडीसाठी उपस्थित नव्हते.” त्याचा इशारा अष्टपैलू रवींद्र जडेजावर होता.
३. मोहम्मद शमी
वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा संघात समावेश केला जाऊ शकतो. शमीकडे वेग आणि स्विंग आहे. शेवटच्या षटकांत मोहम्मद शमी संघासाठी खूप किफायतशीर ठरतो. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या कसोटीत शमीने शानदार गोलंदाजी केली होती. पण त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. त्याचमुळे त्याचे वेस्ट इंडिजविरुद्धच्या या मालिकेतील संघात पुनरागमन होऊ शकते.
त्याने नुकतेच ५५ कसोटी सामन्यात २०० बळीही पूर्ण केले आहेत. ही कामगिरी करणारा तो ११ वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. सर्वात कमी कसोटी खेळून २०० कसोटी बळी घेण्याच्या बाबतीत शमी ८ व्या क्रमांकावर आहे. मोहम्मद शमीने भारताकडून वनडेमध्ये ७९ सामने खेळत १४८ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘चौकार-षटकार मारूनच जिंकता येते, ही आताच्या तरुणांची विचारसरणी’, गावसकरांनी दीपक चाहरला फटकारले
आयपीएल लिलावात ‘या’ दोन परदेशी खेळाडूंवर असेल सर्वांचीच नजर; एक आहे बीबीएलचा सर्वोत्तम खेळाडू
व्हिडिओ पाहा – नेमका जॉन राईट आणि सेहवाग मध्ये वाद तरी काय होता?