---Advertisement---

टी२० विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकणार ‘हा’ स्टार क्रिकेटर, जिंकल्यात ३ आयसीसी ट्रॉफी

On: शुक्रवार, नोव्हेंबर 5, 2021 8:48 AM
---Advertisement---

गुरुवारी (४ नोव्हेंबर) आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिज आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने होते. श्रीलंका संघाचा हा सुपर-१२ फेरीतील शेवटचा सामना होता. या सामन्यात श्रीलंका संघाने २० धावांनी जोरदार विजय मिळवला. तर दुसरीकडे वेस्ट इंडिज संघाला या संपूर्ण स्पर्धेत साजेशी कामगिरी करता आली नाही. ४ सामन्यात त्यांना केवळ १ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले. अशातच श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर ड्वेन ब्रावो याने मोठी घोषणा केली आहे.

या पराभवासह आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतून वेस्ट इंडिज संघ बाहेर झाला आहे. या स्पर्धेच्या सुपर १२ फेरीत वेस्ट इंडिज संघाचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना ड्वेन ब्रावोच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार आहे. हा सामना झाल्यानंतर ड्वेन ब्रावोने निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. गेली कित्येक वर्षे ड्वेन ब्रावोने वेस्ट इंडिज संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे.

याबाबत बोलताना ड्वेन ब्रावो म्हणाला की, “मला वाटते की, आता वेळ आली आहे. माझी कारकीर्द शानदार राहिली. १८ वर्षे वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व करताना काही चढ-उतार आले आहे, पण जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा इतका वेळ या प्रदेश आणि कॅरेबियन लोकांचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल मी खूप आभारी आहे. आम्ही आयसीसीचे ३ चषक जिंकले. एका गोष्टीवर आम्हाला खूप अभिमान आहे की, आम्ही जागतिक स्तरावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यात यशस्वी ठरलो.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “माझे लक्ष एकच असणार आहे की माझ्याकडे जी माहिती आहे, जो अनुभव आहे तो युवा खेळाडूंना द्यायचं. मला वाटते की, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल आहे आणि लोकांना पाठिंबा देणे आणि प्रोत्साहन देणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.”

दोन वेळेस आयसीसी टी-२० चषक विजेत्या ड्वेन ब्रावोने वेस्ट इंडिज संघासाठी एकूण ९० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला १ हजार पेक्षा अधिक धावा करण्यात यश आले आहे. तर गोलंदाजी करताना त्याने ७८ गडी बाद केले आहे. तसेच ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणारा सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार आहे. वेस्ट इंडिज संघासाठी हा त्याचा २९४ वा सामना असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

एकसारखेच, पण आहेत वेगवेगळे! अफगाणिस्तानला मिळाला ‘बुमराह’, गोलंदाजी ऍक्शनचा व्हिडिओ चर्चेत

केवळ एक धाव काढणाऱ्या ‘युनिव्हर्स बॉस’ गेलच्या नावे टी२० विश्वचषकातील नकोसा विक्रम

विराट कोहलीनंतर ‘या’ खेळाडूला करावे भारतीय संघाचा कर्णधार, दिनेश कार्तिकने दिला सल्ला,

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---