बांगलादेशविरुद्धच्या दुसर्या कसोटीच्या तिसर्या दिवशी वेस्ट इंडीजने उत्तम क्रिकेटचे सादरीकरण करत पहिल्या डावाच्या जोरावर आघाडी घेतली. बांगलादेशचा पहिला डाव २९६ धावांवर संपुष्टात आला. दुसर्या डावात खेळताना वेस्ट इंडीजने दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ गडी गमावून ४१ धावा केल्या आहेत. बॉनर ८ आणि वॉरिकन २ धावा काढून नाबाद आहेत. वेस्ट इंडिजकडे सध्या एकूण १५४ धावांची आघाडी आहे.
बांगलादेशच्या फलंदाजांची समाधानकारक फलंदाजी
तिसऱ्या दिवसाच्या सुरूवातीला काही फलंदाजांनी बांगलादेशकडून शानदार प्रदर्शन केले. मुशफिकुर रहीमने ५४ धावा फटकावल्या. त्याव्यतिरिक्त लिट्टन दासने बांगलादेशसाठी सर्वोत्तम खेळी करताना ७१ धावा केल्या. त्याला अष्टपैलू मेहदी हसनने चांगली साथ दिली. मेहदी हसननेही ५७ धावा काढून संघाला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला वेस्ट इंडिजला मोठी आघाडी घेण्यापासून रोखता आले नाही. परिणामी, बांगलादेशचा संघ २९६ धावांवर सर्वबाद झाला. वेस्ट इंडिजकडून रहकीम कॉर्नवॉलने सर्वाधिक ५ बळी घेतले. गॅब्रिएलने देखील ३ गडी बाद केले.
वेस्ट इंडीजची खराब सुरुवात
दुसर्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या वेस्ट इंडीज संघाला चांगली सुरुवात लाभली नाही. कर्णधार क्रेग ब्रेथवेट ६ धावांवर बाद झाला. यानंतर शेयिन मॉस्लीही बाद झाला. जॉन कॅम्पबेलने चांगली सुरुवात केली. परंतु, तैजुल इस्लामच्या गोलंदाजीवर तो वैयक्तिक १८ धावांवर बाद झाला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा बोनर ८ आणि वॉरिकन २ धावा काढून खेळत होते. बांगलादेशकडून मेहदी हसन, तैजुल इस्लाम आणि नईम हसन यांना प्रत्येकी एक गडी मिळाला.
पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजने मिळवला विक्रमी विजय
बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजने विक्रमी विजय मिळविला होता. बांगलादेशने दिलेल्या ३९६ या धावांचे आव्हान पदार्पणवीर कायले मायर्सच्या द्विशतकाने वेस्ट इंडीजने हे आव्हान तीन गडी राखून पार केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंकन क्रिकेटपटू कुशल मेंडिस अडकला विवाहबंधनात, संघ सहकाऱ्याने फोटो शेअर करत दिली माहिती
प्रेमासाठी काहीपण! भारताचा ‘जंबो’ गोलंदाज कुंबळेने प्रेमासाठी दिली होती न्यायालयीन लढाई
Valentines Week Special : विदेशी मुलींना जीवनसाथी म्हणून निवडलेले ३ भारतीय क्रिकेटपटू