इंग्लंडच्या खराब कसोटी प्रदर्शनात दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत (WI vs Eng Test Series) इंग्लंडचा पराभव पत्करावा लागला आहे. मालिकेतील शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडीजने १० विकेट्सने विजय मिळवला आणि मालिका १-० अशा फरकाने नावावर केली. मालिकेतील पहिले दोन सामने अनिर्णीत राहिले होते, पण या तिसऱ्या सामन्यात इंग्लंड संघ पराभूत झाला आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने मालिकेत चांगली फलंदाजी केली, पण पराभवानंतर तो पुन्हा टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे.
तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने दुसऱ्या डावात ८ विकेट्सच्या नुकसानावर १०३ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. दुसऱ्या डावात इंग्लंडचा पूर्ण संघ १२० धावांवर बाद झाला. वेस्ट इंडीजचा अष्टपैलू कायल मेयर्स (Kyle Mayers) याने चांगली गोलंदाजी केली आणि दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेतल्या. तसेच वेगवान गोलंदाज केमार रोचने दुसऱ्या डावात २ विकेट्स घेतल्या. त्याआधी पहिल्या डावात इंग्लंडचा संपूर्ण संघ २०४ धावांवर सर्वबाद झाला होता आणि प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने २९७ धावा केल्या होत्या.
दुसऱ्या डावात इंग्लंड १२० धावांवर सर्वबाद झाल्यानंतर वेस्ट इंडीजवा विजयासाठी अवघ्या २८ धावांचे लक्ष्य मिळाले. हे लक्ष्य वेस्ट इंडीजने एकही विकेट न गमावता गाठले. वेस्ट इंडीजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट (Kraigg Brathwaite) याने मालिकेत सर्वाधिक ३४१ धावा केल्या आणि मालिकावीर बनला.
तसेच या तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात डी सिल्वाने शतक केले होते, ज्यासाठी त्याला सामनावीर निवडले गेले. इंग्लंडचा कर्णधार जो रुट (Joe Root) याने मालिकेत दोन शतकांसह २८९ धावा केल्या. तसेच जॉनी बेयरस्टोने २२६ धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त इंग्लंडचा एकही खेळाडू २०० धावांचा टप्पा गाठू शकला नाही.
वेस्ट इंडीजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेटने मालिकेत ८५ च्या सरासरीने धावा केल्या. त्याने खेळलेल्या ६ डावांमध्ये ३४१ धावा केल्या. यादरम्यान त्याने एक शतक आणि २ अर्धशतक ठोकले. यासाठी त्याला ९०२ चेंडूंचा सामना करावा लागला. दुसरा कसोटी सामना ब्रेथवेटने स्वतःच्या हिमतीवर अनिर्णीत करून दाखवला होता. वेस्ट इंजीच्या तीन वेगवान गोलंदाजांनी मालिकेत १० पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या. यामध्ये केमार रोच, अल्जारी जोसेफ आणि शिल्स यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे इंग्लंडचा फक्त एक गोलंदाज १० पेक्षा अधिक विकेट्स घेऊ शकला.
महत्वाच्या बातम्या –
गुजरात टायटन्सला मिळाला उपकर्णधार! कॅप्टन हार्दिक पंड्याला मिळणार ‘या’ दिग्गजाची साथ
आजचा सामना: केव्हा आणि कसा पाहाल गुजरात वि. लखनऊ सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
IPL2022| गुजरात वि. लखनऊ सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!