---Advertisement---

कसोटी कर्णधारपदावरून रोहितची होणार हकालपट्टी? वेस्ट इंडीजविरूद्धची मालिका ठरणार निर्णायक

On: बुधवार, जून 14, 2023 6:06 PM
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यावेळी भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया संघाने 209 धावांनी पराभव केला. मागच्या वर्षी आशिया चषक, त्यानंतर टी20 विश्वचषक आणि आता डब्ल्यूटीसी स्पर्धेत भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. लागोपाठ तीन मोठ्या स्पर्धांमध्ये भारताला अपयश अल्याने कर्णधार रोहित शर्मा याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. त्यानंतर आता भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर जाईल. हा दौरा रोहितचा कसोटी कर्णधार म्हणून अखेरचा दौरा देखील ठरू शकतो.

भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यापासून जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023-2025 या सायकलची सुरुवात करेल. या दौऱ्यात रोहितला फलंदाज आणि कर्णधार अशा दुहेरी भूमिकेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. रोहित यामध्ये अपयशी ठरल्यास त्याच्या कसोटी कर्णधारपदावर गदा येऊ शकते. भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सलग दोन सायकलमध्ये अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर बीसीसीआय रोहितला कर्णधारपदावरून हटवण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जाते. कारण, रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ केवळ सात कसोटी सामने खेळला असून, यामध्ये चार विजय, 2 अनिर्णीत व एक पराभव अशी भारतीय संघाची कामगिरी राहिली.

या सर्वांमध्ये रोहितचे वाढणारे वय त्याची कमजोर बाजू सिद्ध होऊ शकते. कारण रोहितने वयाचे 35 वर्ष पार केले असून, त्याच्या फिटनेसवर देखील अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. सलामीवीर म्हणून देशांतर्गत क्रिकेटमध्ये यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईस्वरन व ऋतुराज गायकवाड यांच्यासारखे खेळाडू खोऱ्याने धावा काढताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी मालिकेत रोहितवर मोठी धावसंख्या करण्याचा दबाव असेल.

(West Indies Tour Might Rohit Sharma Last Tour As Test Captain)

महत्वाच्या बातम्या –
ICC Test Rankings: ऑस्ट्रेलियन संघाने केली इतिहासाची पुनरावृत्ती; 39 वर्षांनंतर घडला ‘हा’ योगायोग
मस्तच! 5 चेंडूत 5 षटकार ठोकत अलिशान शराफूची रिंकू सिंगला टक्कर, तुम्ही पाहिला का व्हिडीओ?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---