वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील तिसरा वनडे सामना त्रिनिदात येथे खेळला जातोय. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीज संघाने विजय मिळवल्याने मालिका बरोबरीत आहे. त्याचवेळी तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या बाजूने पडला. या सामन्यासाठी भारतीय संघात रोहित शर्मा व विराट कोहली यांना पुन्हा एकदा विश्रांती दिली गेली. या सामन्यात ऋतुराज गायकवाड खेळताना दिसेल.
मालिकेतील पहिला सामना अत्यंत अटीतटीचा झाल्यानंतर भारतीय संघाने पाच गड्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने दमदार कामगिरी करत भारताला पराभूत केले. त्यामुळे या सामन्यात रोहित शर्मा व विराट कोहली हे संघात पुनरागमन करतील अशी अपेक्षा होती. मात्र, संघ व्यवस्थापनाने हार्दिक पंड्या याच्याकडेच नेतृत्व देण्याचा निर्णय घेतला. याव्यतिरिक्त संघात महत्त्वपूर्ण बदल केले गेले.
अष्टपैलू अक्षर पटेल याच्या जागी फलंदाज ऋतुराज गायकवाड याला संधी दिली गेली. तर, वेगवान गोलंदाज उमरान मालिक याच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकत याची निवड करण्यात आली.
वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): शाई होप(कर्णधार), काइल मेयर्स, ब्रँडन किंग, ऍलिक अथनेझ, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, डॉमिनिक ड्रेक्स, जेडेन सील्स, गुडाकेश मोटी
भारत (प्लेइंग इलेव्हन): हार्दिक पंड्या (कर्णधार), शुबमन गिल, संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जयदेव उनाडकत, मुकेश कुमार
(West Indies v India Captain Ruturaj Gaikwad Makes Comeback West Indies Won Toss And Elected Bowling)
महत्त्वाच्या बातम्या-
लग्नाच्या 1 महिन्यातच बदललं नशीब; वेगवान गोलंदाजाचे एक वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन
रिंकूचे नशीब फळफळले! 18 दिवसात 2 वेळा मिळाली टीम इंडियात जागा; म्हणाला, ‘दररोज 6 तास…’