पाकिस्तानचा संघ सध्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्टइंडिज दौऱ्यावर आहे. पहिल्या कसोटी सामन्यात वेस्टइंडीजने कमालीचे प्रदर्शन करत १ विकेटने हा सामना जिंकला. ज्यामुळे वेस्टइंडिज संघाने या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.
दरम्यान, वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (२० ऑगस्ट) वेस्टइंडीजच्या सबिना पार्क मैदानावर सुरू झाला आहे. वेस्टइंडीजने नाणेफेक जिंकून पाहुणा संघ पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. पाकिस्तान संघाची सुरुवात अत्यंत खराब राहिली. पाकिस्तानने अवघ्या २ धावांमध्येच आपले ३ फलंदाज गमावले होते.
मात्र, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि फवाद आलम यांनी पाकिस्तानच्या संघाचा डाव सावरला. यादरम्यान दोघांनीही अर्धशतकी खेळी करत १५८ धावांची भागीदारी केली. दोन्ही खेळाडू आपल्या चांगल्या लयात असताना पाकिस्तानचा फलंदाज फवाद आलम सामन्याच्या मध्येच दुखापतग्रस्त झाला.
आलम तेव्हा १४८ चेंडूंमध्ये ७६ धावांवर खेळत होता. यादरम्यान तो सारखाच पायाला धरून चालत होता. सुरुवातीला त्याने याकडे दुर्लक्ष केले. मात्र, जेव्हा वेस्टइंडीजचा गोलंदाज जेडन सिल्स गोलंदाजी करत होता, तेव्हा त्याच्या चेंडूवर एक शॉट खेळताना आलम अचानक पीचवर पडला. या दरम्यान त्याच्या पायाला वात आल्याचे जाणवले. त्यानंतर मेडिकल टीम मैदानात आली आणि काही वेळाने निर्णय घेण्यात आला की, आलमला उर्वरित तपासणीसाठी बाहेर जावे लागेल. आणि तो चांगल्या लयात असताना त्याला दुखापत निवृत्ती (रिटायर्ड हॉट) व्हावे लागले.
त्यामुळे सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फवाद आलम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरेल, की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र आलमच्या मध्येच मैदान सोडून जाण्याने बाबर आणि आलम यांची भागीदारी संपुष्टात आली. त्यानंतर बाबर देखील मैदानात जास्त वेळ टिकू शकला नाही. ७५ धावांवर तो देखील बाद झाला. पहिल्या दिवसानंतर पाकिस्तानने ४ विकेटच्या बदल्यात २१२ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
–‘दिग्गज असतात ते, असे बसतात’, पृथ्वी शॉला ‘हिटमॅन’च्या मांडीवर बसलेलं पाहून जाफरला सुचली मस्ती
–तालिबानची क्रिकेटवरही दहशत, ‘या’ मालिकेचे भविष्य अधांतरी
–टी२० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या न्यूझीलंड संघावर माजी भारतीय क्रिकेटर नाराज, म्हणाला…