आजपासून(30 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना सबिना पार्क, किंग्स्टन येथे सुरु होणार आहे. या सामन्यात वेस्ट इंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघाने पहिल्या कसोटीत खेळवलेला 11 जणांचा संघच कायम ठेवला आहे. त्यामुळे या सामन्यातही रोहित शर्मा, आर अश्विन, कुलदीप यादव आणि उमेश यादवला संधी मिळालेली नाही.
तसेच आजही 11 जणांच्या संघात यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतलाच वृद्धिमान सहा ऐवजी पसंती देण्यात आली आहे.
त्याचबरोबर वेस्ट इंडीजकडून अष्टपैलू राहकिम कॉर्नवॉल कसोटी पदार्पण करणार आहे. तसेच त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज शाय होप फिट नसल्याने जहामर हॅमिल्टनला आज 11 जणांच्या संघात संधी मिळाली आहे. तोही आज विंडीजकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार आहे.
असे आहेत 11 जणांचे संघ –
भारत – केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.
वेस्ट इंडीज – क्रेग ब्रेथवेट, जॉन कॅम्पबेल, शमर्ह ब्रूक्स, डॅरेन ब्राव्हो, जाहमर हॅमिल्टन (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमेयर, रहकीम कॉर्नवॉल, रोस्टन चेस, जेसन होल्डर (कर्णधार), केमार रोच, शॅनन गॅब्रिएल.
#TeamIndia Playing XI for the 2nd Test against West Indies.#WIvIND pic.twitter.com/QE5VTKzJc3
— BCCI (@BCCI) August 30, 2019
2nd Test. West Indies XI: K Brathwaite, J Campbell, S Brooks, DM Bravo, S Hetmyer, J Hamilton, R Cornwall, R Chase, J Holder, K Roach, S Gabriel https://t.co/2kjBlPzGkK #WIvInd
— BCCI (@BCCI) August 30, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–अंबाती रायडूने निवृत्तीचा निर्णय घेतला मागे; ‘यांना’ दिले मन बदलण्याचे श्रेय
–आज मैदानात पाऊल ठेवताच कर्णधार कोहली करणारा हा खास विक्रम
–विराट कोहलीकडून ‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीच्या या सर्वात मोठ्या विक्रमाला धोका…