वनडे मालिकेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. उभय संघातील पहिला टी२० सामना ब्रायन लारा स्टेडियम, त्रिनिदाद येथे शुक्रवारी (२९ जुलै) रंगणार आहे. या सामन्याला भारतीय प्रणामवेळेनुसार रात्री ८.०० वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी ७.३० वाजता नाणेफेक झाली असून नाणेफेकीचा कौल वेस्ट इंडिजच्या बाजूने लागला आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली आहे.
यजमान वेस्ट इंडिज संघात शिमरॉन हेटमायरचे पुनरागमन झाले आहे. तसेच अल्झारी जोसेफलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी करण्यात आले आहे. हा त्याचा पदार्पणाचा टी२० सामना असेल.
भारतीय संघाकडून अनुभवी जसप्रीत बुमराहच्या जागी २३ वर्षीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला निवडण्यात आले आहे. रविंद्र जडेजा आणि आर अश्विन यांचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सलामीवीराच्या भूमिकेत दिसेल. शिवाय हार्दिक पंड्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
🚨 Here's #TeamIndia's Playing XI 👇
Follow the match ▶️ https://t.co/qWZ7LSCVXA #WIvIND pic.twitter.com/F5lu3EZy3N
— BCCI (@BCCI) July 29, 2022
असे आहेत दोन्हीही संघ-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंग
वेस्ट इंडिज: शामराह ब्रूक्स, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, निकोलस पूरन (यष्टीरक्षक/कर्णधार), कायले मेयर्स, जेसन होल्डर, अकिल होसेन, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय, कीमो पॉल
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
रेणुका सिंगची ऐतिहासिक कामगिरी, बनली झुलन गोस्वामीनंतर ‘हा’ पराक्रम करणारी दुसरी भारतीय
हरमनप्रीत आणि रेणुकाचे प्रयत्न व्यर्थ, ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत भारतावर मिळवला थरारक विजय
पहिली आणि एकमेव! मितालीलाही जे जमलं नाही, ते हरमनप्रीतने केलं; बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध रचला इतिहास