भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये शुक्रवारी जागतिक कसोटी चँपियनशीपच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर शनिवारी व रविवारी मात्र थोडाफार खेळ क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाला. हा अंतिम सामना केवळ ४ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत इंग्लंड देशातील साउथॅम्प्टनमध्ये रोझ बाऊल स्टेडियममध्ये होतं आहे. भारतीयांकडून गेल्या दिवसांत या शहराचे सतत हवामान गुगलवर चेक केले जात आहे.
सध्या भारतात मान्सून सुरु झाला असून त्यामुळे भारतात गुगलवर काय सर्वाधिक सर्च केले जाणे अपेक्षीत आहे तर ते भारतातील विविध शहर व गावांकडील हवामान. असं असलं तरी सध्या भारतात गुगलवर साउथॅम्प्टनचे हवामान सर्वाधिक सर्च केले जात आहे. याला कारण ठरले आहे ते भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना, जो सध्या या शहरात सुरु आहे.
साउथॅम्प्टन हे इंग्लंडच्या दक्षिण पुर्व भागात हँपशायर काऊंटीमधील शहर असून त्याची अंदाजे लोकसंख्या अडीच लाख आहे. हे शहर लंडनपासून ११० किलोमीटरवर असून येथे लंडनप्रमाणेच लहरी हवामान पाहायला मिळते. कोरोनामुळे जागतिक कसोटी चँपियनशीपचा अंतिम सामना हा लॉर्ड क्रिकेट मैदानावरुन साउथॅम्प्टन येथील रोझ बाऊल स्टेडियमवर हलविण्यात आला. या मैदानावर आजपर्यंत ७ कसोटी सामने झाले असून त्यात इंग्लंड सर्वाधिक ६ तर भारतीय संघ आपला तिसरा सामना खेळत आहे. येथे अनेक वनडे व टी२० सामने मात्र झाले आहेत.
भारतीयांनी गुगलवर सुरु केला साउथॅम्प्टनचे हवामानाचा सर्च
१८ ते २३ जुन दरम्यान येथे जागतिक कसोटी चँपियनशीपचा अंतिम सामना होत आहे. त्यापुर्वीच १६ जुनपासून भारतीयांनी येथील हवामान सर्व करायला सुरुवात केली होती. १८, १९ व २० जुन रोजी तर भारतीयांनी सर्वाधिक वेळा येथील हवामान सर्च केले आहे. अगदी याकाळात मुंबई, पुणे किंवा दिल्लीचे हवामानही त्या तुलनेत खूपच कमी सर्च झाले आहे. शुक्रवारी पावसामुळे एकही षटकाचा खेळ झाला नाही तर शनिवारी ६४.४ षटकांचा खेळ झाला. रविवारी ७७ षटकांचा खेळ झाला. म्हणजेच पहिल्या तीन दिवसांत क्रिकेटप्रेमींची जोरदार निराशा झाली आहे. तसेच हा सामना अतिशय महत्त्वाचा असल्याने क्रिकेटप्रेमी सतत गुगलवर साउथॅम्प्टनचे हवामानाचा सर्च करत आहेत.
तिसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंड ठरलंय भारताला वरचढ
भारतीय संघाचा पहिला डाव २१७ धावांवर संपुष्टात आल्यानंतर न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ४९ षटकांत २ बाद १०१ धावा केल्या होत्या. कर्णधार केन विलीयमसन व अनुभवी रॉस टेलर सध्या मैदानावर ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे तिसऱ्या दिवसाखेर तरी न्यूझीलंडने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. या सामन्यात राखीव दिवस असल्यामुळे सामना २३ जुनपर्यंत खेळवला जावू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मूड स्विंग झाला, पण चेंडू नाही’; टिम इंडियाच्या सुमार गोलंदाजीवर माजी क्रिकेटर नाराज
‘त्याच्या खराब शॉटची चर्चा करणे अयोग्य,’ इंग्लंडच्या माजी खेळाडूने घेतली पंतची बाजू
विकेट मिळेना म्हणून विराट-शुबमनने अवलंबला स्लेजिंगचा मार्ग, किंवी फलंदाजांना ‘असं’ उकसावलं