---Advertisement---

अंगावर काटा आणणारी घटना! इंग्लंडच्या क्रिकेटरचे कुटुंबीय सापडले व्हेलच्या तावडीत, मग..

On: शनिवार, सप्टेंबर 17, 2022 11:17 AM
Gladstone-small-Attack-by-whale
---Advertisement---

इंग्लंडचे माजी वेगवान गोलंदाज ग्लॅडस्टोन स्मॉल यांचे कुटुंबिय मोठ्या अपघातातून वाचले आहेत. ग्लॅडस्टोन यांच्या कुटुंबियांची नाव अटलांटिक महासागरात देवमास्याच्या (व्हेल) तावडीत सापडली होती. परंतु सुदैवाने त्या सर्वांना वाचवण्यात यश आले. देवमास्याशी झालेल्या टक्करनंतर ग्लॅडस्टोन यांच्या कुटुंबियांची नाव महासागरात बुडाली होती. मात्र त्यांना महासागरातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे आणि इंग्लंडला परत पाठवण्यात आले आहे. 

माध्यमांतील वृत्तांनुसार, 60 वर्षीय ग्लॅडस्टोन (Gladstone Small) यांच्या 33 वर्षीय मुलगा जॅकरी स्मॉल, जॅकरीची पत्नी आणि त्यांच्या दोन मुलींना बुडत्या नावेतून वाचवण्यात आले आहे. देवमास्यासोबत (Gladstone Small Family Attacked By Whale) झालेल्या चकमकीत त्यांच्या नावेला मोठे छिद्र पडले होते. यानंतरही जवळपास कोणती नाव नसल्याने जॅकरी आणि त्यांची साथीदार किम पेलेटियर गिरार्ड नावेतच होत्या. त्यांच्याबरोबर त्यांच्या मुली अनुआ (08 वर्षे), विलो (05 वर्षे) आणि त्यांचा पाळीव कुत्रा नाला हेदेखील होते.

बुडत्या नावेत रात्रभर राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका विमानाने त्यांना पाहिले आणि त्वरित त्यांच्या मदतीसाठी लोकांना पाठवले. अशाप्रकारे जॅकरी आणि कुटुंबियांना वाचवण्यात आले. स्वत: ग्लॅडस्टोन यांनी आपल्या कुटुंबियांसोबत ही घटना घडली असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

Photo Courtesy: Twitter/gladstonesmall
Photo Courtesy: Twitter/gladstonesmall

दरम्यान ग्लॅडस्टोन हे इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू राहिले आहेत. ते सध्या समालोचक आहेत. त्यांनी इंग्लंडकडून 1986 ते 1991 दरम्यान 17 कसोटी सामने खेळले होते. या 17 सामन्यांमध्ये त्यांनी 55 विकेट्सही घेतल्या होत्या. तसेच 1986-87 ऍशेस विजेत्या इंग्लंड संघाचाही ते भाग होते. तसेच त्यांनी इंग्लंडकडून 53 वनडे सामनेही खेळले होते. या 53 सामन्यात त्यांनी 58 विकेट्सची कामगिरी केली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---