भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आकाश चोपडा सोशल मीडियावर क्रिकेट संदर्भात वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात. शुक्रवारी देखील आकाश चोपडाने असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती फलंदाजी करत असताना उलटा फिरून जबरदस्त शॉट मारतो. त्या व्यक्तीने मारलेला शॉट खूप लांबपर्यंत गेला आहे. आकाश चोपडाने चाहत्यांसाठी हे एक आव्हान असल्याचे म्हटले आहे.
या पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये आकाश चोपडा समालोचनही करत आहेत. व्हिडिओमधील व्यक्तीने अनोख्या अंदाजात अविश्वसनी शॉट मारल्यानंतर आकाश चोपडाला देखील आश्चर्य वाटते आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा त्या व्हिडिओमधील व्यक्तीने मारलेला अप्रतिम शॉट पाहण्यासाठी सांगतो.
त्याचबरोबर त्याच्या शॉटचे कौतुक करताना आकाश चोपडा म्हणतो की, “अरे भाऊ! तू हे कसे काय केलेस? पुन्हा एकदा हा व्हिडिओ दाखवा. तू हे कसे काय केले?”
त्याचबरोबर आकाश चोपडाने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुम्हीही हे करून दाखवा.’ या व्हिडिओला आतापर्यंत जवळजवळ वीस हजार लाईक मिळाले आहेत.
आकाश चोपडाने पोस्ट केलेल्या या व्यक्तीचा व्हिडिओ पाहून चाहते देखील जबरदस्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका चाहत्याने प्रतिक्रिया देत लिहिले की, ‘खरच हे अप्रतिम आहे.’
https://www.instagram.com/reel/CQ0xICuDuT4/?utm_medium=copy_link
आकाश चोपडा भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू असून सध्या तो एक उत्कृष्ट समालोचक देखील आहे. आपल्या समालोचनाने त्याने अनेक वेळा चाहत्यांची मने जिंकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘धोनी’च्या नावाने शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज, ‘तेंडुलकर’ला बनवले वडील; अज्ञात व्यक्ती संकटात!
विक्रमतोड खेळीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मितालीचे ‘राज्य’, बनली महिला क्रिकेटची ‘मास्टर ब्लास्टर’
ऑस्ट्रेलियाच्या धाकड फलंदाजाचा मोठा निर्णय, ‘या’ टूर्नामेंटसाठी टी२० विश्वचषकावर करणार दुर्लक्ष