मुंबईच्या क्रिकेटचा राजा रोहित शर्मा या नावाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मधील एका स्टँडला रोहितचे नाव देण्यात आले आहे. 16 मे हा दिवस रोहित शर्मा कधीही विसरणार नाही, कारण याच दिवशी ज्या ठिकाणाहून त्याच्या खेळाची सुरुवात झाली होती आज त्याच ठिकाणी त्याचा सन्मान होत आहे. आयपीएल 2025 दरम्यान चाहत्यांचा हिटमॅनला मोठा सन्मान मिळाला आहे. या खास क्षणी महाराष्ट्राच्या अनेक मोठ्या मान्यवरांनी सहभाग घेतला होता.
जेव्हा रोहित शर्माच्या नावाने वानखेडे स्टेडियमवर एका स्टॅन्डचं अनावरण झाल्यानंतर रोहित सहित त्याची संपूर्ण फॅमिली खूप भावूक झाली होती. त्यानंतर रोहितने भावूक होऊन वक्तव्य केले आहे. रोहित शर्मा आता त्या दिग्गजांमध्ये सामील झाला आहे, ज्यांच्या नावाने वानखेडे स्टेडियममध्ये अनेक स्टॅन्ड आहेत.
रोहितच्या आधी वानखेडे स्टेडियममध्ये महान खेळाडू सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसकर आणि विजय मर्चंट यांच्या नावाचे स्टॅन्ड होते तसेच आता या खेळाडूंमध्ये रोहित शर्माचे सुद्धा नाव सामील झाले आहे.
या कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई क्रिकेट संघाचे काही अधिकारी रोहित शर्माचे आई-वडील आणि त्याची पत्नी रितिका सुद्धा उपस्थित होती. याशिवाय मुंबई इंडियन्सची ओनर नीता अंबानी आणि पूर्ण मुंबई इंडियन्स संघ सुद्धा तिथे उपस्थित होता. रोहितने आताच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो आता फक्त एका फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे.
या कार्यक्रमाच्या वेळी रोहित अतिशय भावूक झाला तो म्हणाला, हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे आणि मी कधीही स्वप्नातही विचार केला नव्हता की, माझ्या जीवनात कधी असं काहीतरी घडेल. त्याने यासाठी त्याचे आई-वडील प्रशिक्षक आणि चाहत्यांचे मनापासून आभार मानले. जेव्हा वानखेडे स्टेडियमवर जोरजोरात “मुंबईचा राजा रोहित शर्मा” या घोषणा केल्या जातात, तेव्हा हे फक्त त्याच्या खेळासाठी नाही तर मुंबईच्या लोकांच्या मनात त्याच्यासाठी किती खास जागा आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी सिद्ध होतं.
रोहितने मुंबईसाठी घरेलू स्पर्धेत सुद्धा कमालीची कामगिरी केली आहे. याशिवाय भारतासाठी एक यशस्वी कर्णधार म्हणून त्याने नेतृत्व केले आहे. यांच्या नेतृत्वात भारताने 2024 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 भारताच्या नावावर केली आहे.






