---Advertisement---

रोहितच्या निवृत्तीवर सौरव गांगुलींची प्रतिक्रिया, केलं आश्चर्यचकित करणारं विधान

---Advertisement---

भारतीय संघाचा इंग्लंड दौरा एका महिन्यात सुरू होणार आहे. त्याआधीच भारतीय दिग्गज खेळाडू रोहित शर्माने अचानक कसोटी क्रिकेट मधून रिटायरमेंट घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आता टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी रोहितने निवृत्ती घेतल्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्यांनी रोहितच्या नेतृत्वाचे कौतुक केले, ज्याच्या अंतर्गत भारताने 2024 टी 20 वर्ल्ड कप आणि 2025 चॅम्पियन ट्रॉफी जिंकली.

इंडिया टुडे रिपोर्टनुसार सौरव गांगुली म्हणाले, निवृत्ती एका खेळाडूचा व्यक्तिगत निर्णय असतो. मी मानतो की, ही त्याची निवृत्ती घेण्याची योग्य वेळ होती. त्याने भारतासाठी खूप क्रिकेट खेळले आहे आणि भविष्यातील बाकीच्या प्रोजेक्टसाठी मी त्याला शुभेच्छा देतो.

पुढे बोलताना सौरव गांगुली म्हणाले, रोहित शर्मा एक उत्तम लीडर आहे. यामुळेच तो भारतीय संघाचा कर्णधार बनला. माझ्यासाठी हे आश्चर्याची गोष्ट नाही की, त्याच्या नेतृत्वाखाली भारताने टी20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्याचं करिअर उत्तम राहील आहे, ज्यासाठी त्याला स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे.

रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामना आणि 2023 वनडे आंतरराष्ट्रीय अंतिम सामना खेळला होता. दोन्ही वेळी त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. रोहितच्या कसोटी क्रिकेट करिअरवर नजर टाकल्यास, त्याने 67 सामन्यात 4301 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सरासरी 40.57 राहिली आहे. त्याने यादरम्यान 18 अर्धशतक आणि 12 शतके झळकावली आहेत.

रोहित शर्माने निवृत्ती घेतल्याचे मुख्य कारण म्हणजे, त्याचा खराब फॉर्म. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून जोरदार पराभव पत्करावा लागला होता. भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात देखील त्यांना जागा बनवता आली नाही. मागच्या तीन कसोटी मालिकेत 15 डावात रोहितने फक्त 164 धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---