---Advertisement---

विराटच्या पहिल्या कसोटीत खेळलेले भारतीय खेळाडू आता करतात तरी काय? घ्या जाणून

On: शुक्रवार, मार्च 4, 2022 6:14 PM
Team-India
---Advertisement---

भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना खेळत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना शुक्रवारी (४ मार्च) मोहालीमध्ये सुरू झाला, जो विराटसाठी खास आहे. विराटने २०११ मध्ये त्याच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि आज तो १०० वा कसोटी सामना खेळत आहे.

माजी कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघातून विराटने कसोटी पदार्पण केले होते. तसेच सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही त्यावेळी संघात खेळाडूच्या भूमिकेत सहभागी होते. विराटने कसोटी पदार्पण करून एक दशक पूर्ण झाले आहे. दरम्यानच्या काळात अनेक बदल घडले आहेत. अशात अनेकांना विराटच्या कसोटी पदार्पणच्या सामन्यातील भारताच्या प्लेइंग इलेव्हनविषयी प्रश्न पडला असेल.

आपण या लेखात त्या सामन्यातील भारताच्या प्लेइंग इलेव्हनचीच माहिती घेणार आहोत. विराटव्यतिरिक्त या सामन्यात प्रवीण कुमार आणि अभिनव मुकुंदनेही पदार्पण केले होते. भारतीय संघ या सामन्यामध्ये ६३ धावांनी पराभूत झाला होता.

विराटच्या कसोटी पदार्पणाच्या सामन्यात खेळलेली प्लेइंग इलेव्हन
सलामीवीर जोडी – अभिनव मुकुंद आणि मुरली विजय
विराट कोहलीच्या कसोटी पदार्पणाच्या सामन्यात अभिनव मुकुंद आणि मुरली विजय यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली होती. मुकुंदने पहिल्या डावात ११, तर दुसऱ्या डावात २५ धावा केल्या होत्या. दुसरीकडे मुरली विजय पहिल्या डावात ८, तर दुसऱ्या डावात ० धावांवर बाद झाला होता. सध्या हे दोन्ही खेळाडू कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सहभाग घेताना दिसत नाहीत. मुकुंदला समालोचकाच्या भूमिकेत पाहिले गेले आहे.

मधली फळी – राहुद द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि विराट कोहली 
मध्यक्रमात भारतीय संघाकडून राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि विराट कोहली सहभागी झाले होते. राहुल द्रविडने पहिल्या डावात ४० आणि दुसऱ्या डावात ११२ धावा केल्या होत्या. या कामगिरीसाठी त्यांना त्यावेळी सामनावीर पुरस्कारही दिला गेला होता. त्याव्यतिरिक्त व्हीव्हीएस लक्ष्मण १२ आणि ० धावा करून बाद झाले होते. विराटने या सामन्यात पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात १५ धावा केल्या होत्या. द्रविड सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत, व्हीव्हीएस लक्ष्मण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) प्रमुख आहेत, तर विराट कोहली अजूनही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.

यष्टीरक्षक आणि अष्टपैलू – एमएस धोनी आणि सुरेश रैना
विराटच्या पदार्पण कसोटी सामन्यात एमएस धोनी भारतीय संघाचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज होता. या सामन्याच्या पहिल्या डावात धोनीने ०, तर दुसऱ्या डावात १६ धावा केल्या होत्या. सध्या धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, पण आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे तो अजूनही नेतृत्व करत आहे.

अष्टपैलू सुरेश रैनाने या सामन्यातील पहिल्या डावात ८२ आणि दुसऱ्या डावात २७ धावा केल्या होत्या. गोलंदाजी करताना त्याला एक विकेट मिळाली होती. रैना सध्या क्रिकेटमध्ये सक्रिय सहभाग घेत नाही आणि कुटुंबासोबत त्याचा अधिक वेळ घालवत आहे. आयपीएल २०२२ साठी त्याला कोणत्याही फ्रेंचायझीने विकत घेतले नाहीय. तसेच त्यानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

गोलंदाजी आक्रमण – हरभजन सिंग, अमित मिश्रा, प्रवीण कुमार आणि इशांत शर्मा
या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले होते. हरभजन सिंगने पहिल्या डावात २-५१ (५१ धावा खर्च करून दोन विकेट्स) आणि दुसऱ्या डावात १-५४ असे प्रदर्शन केले होते. पदार्पण करणाऱ्या प्रवीण कुमारने पहिल्या डावात ३-३८, तर दुसऱ्या डावात ३-४२ असे प्रदर्शन केले होते. अमित मिश्राने पहिल्या डावात २-५१, तर दुसऱ्या डावात २-६२ अशा विकेट्स घेतल्या होत्या. इशांत शर्मानेही चांगले प्रदर्शन करत पहिल्या डावात ३-२९ तर दुसऱ्या डावात ३-८१ असे प्रदर्शन केले होते.

सध्या या खेळाडूंचा विचार केला, तर इशांत शर्मा कसोटी संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.  हरभजन सिंग आणि प्रवीण कुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. हरभजन आता समालोचकाच्या भूमिकेत दिसत आहे. अमित मिश्रा मागच्या आयपीएलपर्यंत खेळत होता, पण २०२२ च्या मेगा लिलावात त्याला खरेदीदार मिळालेला नाही.

महत्वाच्या बातम्या –

विराटने ३८ वी धाव करताच नावावर झाला मोठा विक्रम; यापूर्वी केवळ ५ भारतीयांनी केलाय कारनामा

रिकी पाँटिंगनंतर बरेच खेळाडू १०० कसोटी खेळले, पण ‘तो’ पराक्रम एकट्या विराट कोहलीलाच जमला

कधी सुधारणार रोहित शर्मा! मोहाली कसोटीत छोटीशी चूक करत फक्त २९ धावांवर झाला बाद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---