भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी टी२० लीग असणारी आयपीएल सध्या पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पहाता १५ एप्रिलपर्यंत आयपीएल स्थगित करण्यात आली आहे. यानंतरच बीसीसीआय आयपीएलवर निर्णय घेईल.
परंतु त्यापूर्वी भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंगने (R.P. Singh) आपल्या सर्वकालीन आयपीएल अकरा जणांच्या संघाची निवड केली आहे. सिंगने आपल्या अकरा जणांच्या संघात ४ परदेशी खेळाडूंसमवेत ७ भारतीय खेळाडूंचा समावेश केला आहे. तर अष्टपैलू क्रिकटपटू रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) संघातील १२ वा खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.
Hello friends, जैसा कि मैनें आपलोगों से कल वादा किया था here is my #IPLXI . @davidwarner31 @ImRo45 @imVkohli @ABdeVilliers17 @msdhoni @Russell12A @ashwinravi99 @MishiAmit @BhuviOfficial @Jaspritbumrah93 pic.twitter.com/ZArh4TJo2z
— R P Singh रुद्र प्रताप सिंह (@rpsingh) March 30, 2020
सिंगने आपल्या अकरा जणांच्या संघात सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित शर्माला (Rohit Sharma) निवडले आहे. तर रोहितचा सलामीवीर सहकारी फलंदाज म्हणून डेव्हिड वॉर्नरला (David Warner) निवडले आहे. तर तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज म्हणून विराट कोहलीला (Virat Kohli) स्थान दिले आहे. तसेच चौथ्या क्रमांकासाठी सिंगने एबी डिविलियर्सची (AB De Villiers) निवड केली आहे.
विशेष म्हणजे भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) सिंगने अकरा जणांच्या संघात पाचव्या क्रमांकावरील स्थान दिले आहे. तसेच सहाव्या क्रमांकावरील खेळाडू म्हणून अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेलचा (Andre Russell) समावेश केला आहे.
सिंगने आपल्या आवडत्या अकरा जणांच्या आयपीएल संघात २ फिरकीपटू म्हणून आर अश्विनचा (R Ashwin) समावेश केला आहे जो फलंदाजीही करतो. तर अश्विनचा जोडीदार म्हणून अमित मिश्राचा (Amit Mishra) समावेश केला आहे.
सिंगने आपल्या संघात ३ वेगवान गोलंदाजांना स्थान दिले आहे. यामध्ये भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar), लसिथ मलिंगा (Lasith Malinga) आणि जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) समावेश आहे. तसेच संघातील १२ वा खेळाडू म्हणून सिंगने जडेजाला स्थान दिले आहे. सर्व खेळाडूंची निवड केली असली तरी सिंगने अजूनही या संघाचा कर्णधार निवडलेला नाही.
असा आहे आरपी सिंगचा सर्वकालीन ११ जणांचा आयपीएल संघ- (This is RP Singh’s all-time IPL squad of 11)
डेव्हिड वॉर्नर, रोहित शर्मा, विराट कोहली, एबी डिविलियर्स, एमएस धोनी, आंद्रे रसेल, आर. अश्विन, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा. (संघातील १२ वा खेळाडू)
ट्रेंडिंग घडामोडी-
-डेविड वाॅर्नरने या कारणामुळे केला टक्कल, चाहत्यांनी केले कौतूक
वनडेत शेवटच्या षटकात गोलंदाजी करताना अशी कामगिरी करणारा सचिन जगातील एकमेव
-मोठ्या क्रिकेटरच्या गाडीतून चोरी झाले पाकिट, चोराने केली मोठी शाॅपिंग