मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात शनिवारी (२१ मे) आयपीएल २०२२चा ६९वा सामना खेळला जात आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना होत आहे. प्लेऑफमधील चौथ्या स्थानाच्या दृष्टीने हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. अशात या सामन्यावर पावसाचे सावट पसरले आहे. जर अचानक मुंबईत जोराचा पाऊस सुरू झाला आणि ही महत्त्वाची लढत रद्द करावी लागली, तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाचे काय होणार?, याचा आढावा घेऊ.
मुंबई विरुद्ध दिल्ली सामन्यापूर्वी संध्याकाळी ७ वाजता उभय संघांचे कर्णधार रोहित शर्मा आणि रिषभ पंत नाणेफेकीसाठी मैदानावर आले होते. यावेळी पावसाच्या हलक्या सरी कोसळताना दिसल्या. रोहितने नाणेफेक जिंकून प्लेइंग इलेव्हनबद्दल माहिती दिल्यानंतर हलका पाऊस सुरू झाला होता. त्यानंतर रिषभ दिल्लीची प्लेइंग इलेव्हन घोषित करत असताना पावसाचा वेग वाढल्याचे दिसले.
त्यानंतर लगेचच काही मिनिटांनी पाऊस थांबला खरे. परंतु जर सामना चालू असताना पुन्हा जोराचा पाऊस सुरू झाला आणि मुंबई विरुद्ध दिल्ली सामना रद्द करावा लागल्यास प्लेऑफचे गणित कसे असेल?, आरसीबी आणि दिल्ली संघांपैकी कोणता संघ प्लेऑफमध्ये पोहोचेल?, असे प्रश्न उपस्थित होतात.
जर पावसामुळे हा सामना रद्द झाला तर, मुंबई आणि दिल्ली या दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी १-१ गुण जमा होतील. यासह मुंबईच्या खात्यात अजून एका गुणाची नोंद होईल आणि ७ गुणांसह हा संघ गुणतालिकेत तळाशी कायम राहिल. दुसरीकडे गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली संघाच्या खात्यात अजून एक जमा होईल आणि त्यांचे एकूण गुण १५ होतील. परंतु या एका गुणाचा दिल्लीला कसलाही फायदा होणार नाही. दिल्ली संघ १५ गुणांसह पाचव्या स्थानी कायम राहिल आणि ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकले जातील. मात्र याचा फायदा आरसीबीला होईल.
कारण आरसीबी संघ सध्या १६ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे गुणांच्या जोरावर आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरणारा चौथा संघ बनेल. अशात प्लेऑफमध्ये त्यांची लढत लखनऊ सुपरजायंट्ससोबत होईल. उभय संघ २५ मे रोजी ईडन गार्डन्सवर एलिमिनेटर सामन्यात भिडतील.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधारपद तर गेलंच पण नावावर असलेला खास रेकॉर्डही गेला; जड्डूचा ऑल टाईम रेकॉर्ड आता रियानच्या नावावर
आयपीएल २०२२मध्ये सीएसके कुठे कमी पडली? ‘हे’ एक कारण आहे जे कुणीच नाकारु शकत नाही
Video: मोईन अलीसमोर ट्रेंट बोल्टही हतबल, ओव्हरमधील सर्व ६ चेंडू केले सीमापार