---Advertisement---

टी20 मध्ये रोहित-विराटच्या पुढे विचार करतेय बीसीसीआय? युवा खांद्यांवर वर्ल्डकपची जबाबदारी?

On: गुरूवार, नोव्हेंबर 30, 2023 10:30 PM
---Advertisement---

पुढील महिन्यात सुरू होत असलेल्या भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघनिवड झालेली आहे. या दौऱ्याची सुरुवात तीन सामन्यांच्या टी20 मालिकेने होईल. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात 17 सदस्यीय संघ निवडला गेला आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांनी विश्रांतीची मागणी केल्यामुळे ते या संघाचा भाग नसतील. असे असले तरी आता रोहित व विराट यांच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीविषयी प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.

पुढील वर्षाच्या मध्यात भारतीय संघाला टी20 विश्वचषक खेळायचा आहे. तत्पूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत तीन व अफगाणिस्तानविरुद्ध तीन असे सहा आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणार आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्धचे हे सामने 10 डिसेंबरपासून होतील. तर जानेवारी महिन्यात अफगाणिस्तानविरुद्धची मालिका पार पडेल. त्यानंतर भारताचे सर्व खेळाडू मार्च ते मे यादरम्यान आयपीएल खेळताना दिसतील. आयपीएल संपल्यानंतर लगेचच भारतीय संघ विश्वचषकासाठी रवाना होईल.

विराट व रोहित यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला अखेरचा टी20 सामना मागील वर्षीच्या टी20 मालिकेतील उपांत्य सामन्यात खेळला होता. त्यानंतर तब्बल 385 दिवस झाले ते आंतरराष्ट्रीय स्तरावर टी20 सामना खेळलेले नाहीत.

बीसीसीआयने या दोघांनाही आपल्या टी20 कारकिर्दीविषयी विचार करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र, ते आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले. सध्या भारतीय टी20 संघात वरच्या फळीत यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन व शुबमन गिल हे सातत्याने चांगली कामगिरी करत असल्याने विराट व रोहित यांच्यावर देखील दबाव असेल.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, जितेश शर्मा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, तिलक वर्मा व मोहम्मद सिराज.

(What Is Future Of Virat Kohli And Rohit Sharma In T20I BCCI Have Plans For T20 World Cup)

महत्वाच्या बातम्या – 
‘आता परिणाम भोगा…’, 24 वर्षीय गिलच्या हाती कर्णधारपदाची सूत्रे देताच डिविलियर्सची गुजरातला चेतावणी
टी20 वर्ल्डकपसाठीचे 20 संघ फायनल! यांना मिळाले तिकिट, तर यांचा झाला हिरमोड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---