आयपीएलच्या सामन्यांमध्ये तुम्ही अनेकदा चीअरलीडर्स पाहिल्या असतील. स्पर्धेच्या पहिल्या हंगामापासून त्या प्रेक्षकांच्या आकर्षणाचं केंद्र राहिल्या आहेत. मॅचमध्ये आपापल्या संघाच्या फलंदाजानं चौकार आणि षटकार मारल्यानंतर किंवा गोलंदाजानं विकेट घेतल्यानंतर चीअरलीडर्स नाचताना दिसतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की आयपीएलच्या सामन्यांमधील चीअरलीडर्सना किती पैसे मिळतात? नसेल माहीत तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
वेगवेगळ्या आयपीएल टीमच्या चीअरलीडर्सना वेगवेगळे पगार मिळतात. आयपीएल सामन्यांमध्ये चीअरलीडर्सना सरासरी 14 हजार ते 17 हजार रुपये मिळतात. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांसारख्या संघांच्या चीअरलीडर्सना प्रत्येक सामन्यासाठी सुमारे 20 हजार रुपये मिळतात.
शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्स चीअरलीडर्सना प्रत्येक सामन्यासाठी सुमारे 24 हजार रुपये देते. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ चीअरलीडर्सना प्रति सामन्यासाठी अंदाजे 12 हजार रुपये देतात. अशाप्रकारे कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आपल्या चीअरलीडर्सना सर्वाधिक रक्कम देतो.
आयपीएल सामन्यांमध्ये, निश्चित पगाराव्यतिरिक्त चीअरलीडर्सना कामगिरीवर आधारित बोनस देखील दिला जातो. वास्तविक, जेव्हा संघ जिंकतात तेव्हा संबंधित चीअरलीडर्सना बोनस दिला जातो. याशिवाय या चीअरलीडर्सना राहण्यासाठी चांगली जागा आणि जेवणासारख्या इतर सुविधाही मिळतात.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, आयपीएलमध्ये चीअरलीडर्सची निवड कशी केली जाते? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आयपीएल चीअरलीडर बनणं अजिबात सोपं नाही! या चीअरलीडर्सची निवड अनेक मुलाखतींच्या आधारे केली जाते. याशिवाय चीअरलीडर्सना मोठ्या जनसमुदायासमोर नृत्य, मॉडेलिंग आणि सादरीकरणाचा अनुभव असावा लागतो. या सर्व पात्रतेच्या आधारेच चीअरलीडर्सची निवड केली जाते.
आयपीएलमध्ये परफॉर्म करणाऱ्या बहुतांश चीअरलीडर्स विदेशी असतात. मात्र काही भारतीय चीअरलीडर्सही आहेत. कोरोना काळाचा अपवाद वगळता या चीअरलीडर्स आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून स्पर्धेशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांना आयपीएलचा अभिन्न अंग म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही!
महत्त्वाच्या बातम्या-
जोस बटलरनं आपलं नाव बदललं, इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून अधिकृत घोषणा
कोलकाता-राजस्थान सामन्याच्या तारखेत बदल होण्याची शक्यता, जाणून घ्या कारण
महेंद्रसिंह धोनीची ऐतिहासिक कामगिरी!…टी20 क्रिकेटमध्ये आजपर्यंत असं कोणीही करू शकलं नाही