टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडने 5 विकेट्सने जिंकला. यासह इंग्लंडने दुसऱ्यांदा टी20 विश्वचषकाची ट्रॉफी उंचावली. इंग्लंडचा कर्णधार असलेला जोस बटलर पहिल्यांदाच कोणत्याही आयसीसी स्पर्धेत इंग्लंड संघाचे नेतृत्व करत होता. आता या विजयासह त्याने इतिहास रचला आहे. या रोमांचक सामन्यात बटलरने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने इंग्लंडसमोर 138 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान इंग्लंडने 19 षटकात 5 विकेट्स गमावत पूर्ण केले.
टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेचा अंतिम सामना जिंकण्याच्या दुसऱ्या दिवशी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) समुद्र किनारी विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन फिरताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. खरं तर, हे दुसरे-तिसरे काही नसून जोस बटलरचे अधिकृत फोटोशूट आहे. त्यामुळे तो समुद्र किनारी गेला आहे. यावेळी त्याने वेगवेगळे पोझ देत फोटो आणि व्हिडिओ शूट केला. या शूटमध्ये तो एकटाच दिसत आहे.
https://www.instagram.com/reel/Ck7YOzEMClu/?utm_source=ig_embed&ig_rid=57bb975f-54b5-452a-8a48-4c36e7fd1ced
जोस बटलरने रचला इतिहास
खरं तर, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर हा पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धांमध्ये नेतृत्व करत होता. यष्टीरक्षक फलंदाज आणि कर्णधार म्हणून बटलर टी20 विश्वचषक जिंकणारा इंग्लंडचा पहिला खेळाडू बनला आहे. ऑयन मॉर्गन याने निवृत्ती घेतल्यानंतर बटलरला जुलै महिन्यात मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार बनवले होते. यापूर्वी यष्टीरक्षक फलंदाज आणि कर्णधार म्हणून एमएस धोनी (MS Dhoni) याने भारतीय संघाला 2007 साली टी20 विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद जिंकून दिले होते.
दुसरीकडे, कुमार संगकाराने श्रीलंका संघाला 2014 विश्वचषकाचा विजेता आणि यष्टीरक्षक सर्फराज अहमद याच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाने 2017मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
धोनीच्या नावावर खास विक्र
यष्टीरक्षक फलंदाज आणि कर्णधार म्हणून एमएस धोनी याने आयसीसीच्या तीन स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याने 2007मध्ये आयसीसी टी20 ट्रॉफी, 2011मध्ये वनडे विश्वचषकाची ट्रॉफी आणि 2013मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. (what is jos buttler doing on the beach with t20 world cup trophy See video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकीकडे पाकिस्तानी पत्रकाराचे ट्वीट, तर दुसरीकडे मिश्राजींचा ‘विराट’ रिप्लाय, ‘अशी’ केली बोलती बंद
विश्वचषक तर जिंकलाच, पण आता आयपीएलही जिंकायला निघाला इंग्लंडचा ‘हा’ पठ्ठ्या; म्हणाला, ‘मी आता…’