शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) हा गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघासाठी सतत चांगली कामगिरी करतोय. इंग्लंड असो किंवा ऑस्ट्रेलिया या दोन्ही दौऱ्यावर त्याने आपली छाप सोडली आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालकेत देखील जलवा सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू (South Africa vs India 2nd test) असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने फलंदाजी करताना २८ धावांची तुफानी खेळी केली. तर गोलंदाजी करताना त्याने ७ गडी बाद केले होते. या कामगिरीनंतर ‘लॉर्ड शार्दुल’ (Lord Shardul Thakur) पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. काय आहे ‘लॉर्ड शार्दुल’ म्हणाण्यामागचे कारण? याचा खुलासा स्वतः शार्दुल ठाकूरने केला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआयने) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने खुलासा करत म्हटले आहे की, “मला खरंच माहित नाही मला लॉर्ड शार्दुल ठाकूर म्हणायला कोणी सुरुवात केली होती. परंतु, मला खात्री आहे की, जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतलो होतो, त्यावेळी मायदेशात इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत हे सर्व सुरू झाले होते. आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही मालिका झाली होती. ही एक अशी मालिका होती, ज्यामध्ये मला खूप यश मिळाले. यासह मी अनेकदा एकाच षटकात २ गडी बाद केले. त्यानंतर हे सर्व बोलायला सुरुवात झाली.”
तसेच शार्दुल ठाकूरने गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे (Paras Mhambre) यांना म्हटले की, “जेव्हा मी मैदानात प्रवेश करतो. त्यावेळी आत्मविश्वास आणि आत्मविश्वासच माझ्यासाठी सर्व काही असतं. मी पूर्ण आत्मविश्वासासह मैदानात प्रवेश करत असतो. हाच माझ्या यशाचा मंत्र आहे. हेच मी पुढे देखील सुरू ठेवणार आहे. मी चेंडू योग्य टप्प्यावर टाकण्याचा प्रयत्न करत होतो. खेळपट्टीवर मदत मिळत होती. तसेच देवाच्या कृपेने मला ७ गडी बाद करण्यात यश आले. संघाला योगदान देऊन मला भरपूर आनंद झाला.”
Man of the moment @imShard reacts to the social media frenzy post his 7⃣-wicket haul at The Wanderers. ???? ????
P.S. How did he get the title of 'Lord'? ???? #TeamIndia #SAvIND
To find out, watch the full interview by @28anand ???? ???? https://t.co/dkWcqAL3z5 pic.twitter.com/vSIjk2hvyR
— BCCI (@BCCI) January 5, 2022
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर भारतीय संघाने पहिल्या डावात २०२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाला २२९ धावा करण्यात यश आले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने २६६ धावा केल्या होत्या. आता दक्षिण आफ्रिका संघाला विजयासाठी २४० धावांची आवश्यकता आहे.
महत्वाच्या बातम्या :
वाढदिवस विशेष: १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल खास १० गोष्टी
क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलमन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले
हे नक्की पाहा :






