---Advertisement---

भारताचा मिळणार स्प्लीट कॅप्टन्स? कोणी केली होती याची सुरुवात? वाचा सविस्तर

On: सोमवार, सप्टेंबर 13, 2021 3:04 PM
---Advertisement---

सध्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार असलेला विराट कोहली हा ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे होणाऱ्या टी२० विश्वचषकानंतर मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची बातमी माध्यमांद्वारे समोर येत आहे. त्याच्या जागी वनडे व टी२० संघाचा कर्णधार म्हणून अनुभवी सलामीवीर रोहित शर्माची निवड केली जाऊ शकते. असे झाल्यास भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा स्प्लीट कॅप्टन्सी पाहायला मिळू शकते.

काय आहे स्प्लीट कॅप्टन्सी?
स्प्लीट कॅप्टन्सी म्हणजे नेतृत्वाचे विभाजन. क्रिकेटमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारांसाठी दोन वेगवेगळे कर्णधार नेमणे याला स्प्लीट कॅप्टन्सी म्हटले जाते. अशा प्रकारचा पहिला प्रयोग सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाने केला होता. ९० च्या दशकात ऑस्ट्रेलियन संघाचा कसोटी संघाचा कर्णधार मार्क टेलर तर वनडे संघाचा कर्णधार स्टीव वॉ याला बनविण्यात आले होते. पुढे, वॉ व रिकी पॉंटिंग यांनी ही प्रथा सुरू ठेवली. मधल्या काळात दक्षिण आफ्रिकेसाठी एबी डिव्हिलियर्स व फाफ डू प्लेसिस हे अशाप्रकारे नेतृत्व करत.

भारतीय संघानेही केला आहे प्रयोग
भारतीय क्रिकेटमध्ये यापूर्वी स्प्लीट कॅप्टन्सीचा पर्याय वापरला गेला आहे. २००७-२००८ या काळात कसोटी संघाचा कर्णधार म्हणून अनिल कुंबळे तर मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार म्हणून एमएस धोनी काम पाहत. २०१३ मध्ये धोनीने अचानकपणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर विराट कोहली याला कसोटी संघाचा तर, दोन्ही हा मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार नेमण्यात आले होते. त्यामुळे आता रोहित शर्माला मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार बनवलास भारतीय क्रिकेटच्या इतिहासात तिसऱ्यांदा स्प्लीट कॅप्टन्स पाहायला मिळतील.

सध्या हे देश वापरतात स्प्लीट कॅप्टन्स
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक देश स्प्लीट कॅप्टन्स म्हणजे दोन वेगवेगळे कर्णधार वापरत आहेत. त्यांची यादी पुढील प्रमाणे-
इंग्लंड- जो रूट (कसोटी), ओएन मॉर्गन (वनडे व टी२०)

ऑस्ट्रेलिया- टीम पेन (कसोटी), ऍरॉन फिंच (वनडे व टी२०)

श्रीलंका- दिमुथ करूणारत्ने (कसोटी), दसुन शनाका (वनडे व टी२०)

दक्षिण आफ्रिका- डीन एल्गर (कसोटी), टेंबा बवुमा ( वनडे व टी२०)

वेस्ट इंडीज- क्रेग ब्रेथवेट (कसोटी), कायरन पोलार्ड (वनडे व टी२०)

बांगलादेश- मोमीनुल हक (कसोटी), तमीम इक्बाल (वनडे), महमदुल्लाह (टी२०)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---