इंडियन प्रीमियर लीग (IPL) ची ब्रँड व्हॅल्यू दरवर्षी वाढत आहे. 2023 मध्ये आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू 15.4 अब्ज यूएस एवढी होती, परंतु आता 17 व्या हंगामाच्या समाप्तीनंतर त्यात 6.5 टक्क्यांनी जबरदस्त भर पडली आहे. आता आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू 16.4 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे, जे की, भारतीय चलनात 1.3 लाख कोटी रुपयांच्या बरोबर आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) ची ब्रँड व्हॅल्यू सर्वात जास्त आहे.
आयपीएलमध्ये आता एकूण 10 फ्रँचायझी आहेत, त्यापैकी चेन्नई सुपर किंग्स ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत अव्वलस्थानी आहे. 2024 मध्ये सीएसकेचे ब्रँड मूल्य $231 दशलक्ष आहे, जे भारतीय चलनात 19 अब्ज रुपयांच्या बरोबर आहे आहे. 2024 मध्ये सीएसकेच्या कर्णधारपदावरून पायउतार झालेल्या एमएस धोनीच्या उपस्थितीमुळे या फ्रँचायझीचे बाजार मूल्यही गगनाला भिडले आहे. त्याचप्रमाणे आयपीएल मध्ये सर्वाधिक फॅनबेस असणार संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्स आहे. ज्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे एम. एस धोनी आहे.
2024 च्या हंगामासाठी 15 कंपन्या सीएसकेला प्रायोजित करत होते हे आश्चर्यकारक होते. संघाचा शीर्षक प्रायोजक ‘TVS Eurogrip’ होता, ज्याच्यासोबत सीएसकेने 2021 मध्ये तीन वर्षांसाठी 100 कोटी रुपयांचा करार केला होता. चेन्नई सुपर किंग्जने ‘इतिहाद एअरवेज’ सोबत 100 कोटी रुपयांचा करारही केला असून संघाच्या जर्सीच्या मागील बाजूस त्याचा लोगो छापण्यात आला आहे. याशिवाय गल्फ ऑइल, रिलायन्स जिओ, कोका कोला आणि इंडिया सिमेंट सारख्या मोठ्या कंपन्या सीएसकेला प्रायोजित करत आहेत.
चेन्नईने आतापर्यंत 17 पैकी 15 हंगाम खेळले आहेत, ज्यामध्ये हा संघ 12 वेळा प्लेऑफमध्ये गेला आहे. 12 वेळा प्लेऑफमध्ये जाण्याव्यतिरिक्त, चेन्नई सुपर किंग्जने 10 वेळा आयपीएल फायनल खेळली आहे आणि 5 वेळा ट्रॉफी उचलण्यातही यश मिळवले आहे. या बाबतीत, आरसीबी दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याची ब्रँड व्हॅल्यू 227 दशलक्ष डॉलर्स एवढी आहे.
आयपीएलच्या 17 व्या हंगमात चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत पाचव्या स्छानावर राहिली. शेवटच्या साखळी सामन्यात आरसीबीने सीएसकेचा पराभव केला, ज्याकारणाने चेन्नईला प्लेऑफसाठी क्वाॅलिफाय करता आले नाही.
महत्तवाच्या बातम्या-
भारत-अमेरिका सामन्यापूर्वी, भारताच्या दिग्गज खेळाडूचा टीम इंडियाला सल्ला
रिषभ पंत भारताचा दुसरा युवराज सिंग? कपिल देव यांनी दिली खळबळजनक प्रतिक्रिया!ॉ
कॅनडा विरुद्धच्या सामन्यात हारिस रौफ चमकला, रचला इतिहास!