क्रिकेटच्या खेळात फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक जितके आवश्यक असतात. तितकेच महत्त्व अंपायर यांना देखील असते. कारण एकच पंच असतो ज्याच्या आदेशाचे सर्व खेळाडू पालन करतात. आंतरराष्ट्रीय सामन्यात अंपायरिंग करणे सोपे नाही. कारण वाइड ते एलबीडब्ल्यू आणि इतर निर्णयांवरून अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की एका वनडे सामन्यासाठी अंपायरला किती पगार मिळतो?
आंतरराष्ट्रीय सामन्यात अंपायरिंग करण्यासाठी आयसीसीची परवानगी आवश्यक असते. एक उच्चस्तरीय पंच वार्षिक 66.8 लाख ते 1.67 कोटी रुपये कमवू शकतो. पगाराव्यतिरिक्त त्यांना प्रवास खर्च, हॉटेल निवास आणि जेवणाचा खर्चही दिला जातो. पंचांचा पगारही त्यांच्या क्रिकेटमधील उंचीवर आणि त्यांना किती अनुभव आहे यावर अवलंबून असतो.
एका वनडे सामन्यासाठी अंपायरला 2500-3000 यूएस डॉलर पगार मिळतो. भारतीय चलनात ही रक्कम 2 लाख ते 2.5 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. याआधी एकदिवसीय सामन्यांतील पंचांचा पगार इतका जास्त नव्हता. पण मोठ्या आणि महत्त्वाच्या सामन्यांतील चुका कमी करण्याच्या उद्देशाने आयसीसीने गेल्या काही वर्षांत पगारात वाढ केली आहे.
अलीम दार आणि कुमार धर्मसेना हे जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या पंचांपैकी एक आहेत. गेल्या काही वर्षांत अनिल चौधरी आणि नितीन मेनन यांच्या रूपाने जगाला दोन जागतिक दर्जाचे पंच मिळाले आहेत. या दोघांचाही समावेश आयसीसीच्या एलिट पॅनेलच्या यादीत आहे आणि गेल्या वर्षी बीसीसीआयने एक यादी प्रसिद्ध केली होती. ज्याअंतर्गत अनिल आणि नितीन यांना देशांतर्गत सामन्यांमध्ये अंपायरिंगसाठी प्रति सामना 40 हजार रुपये मिळतात.
हेही वाचा-
कानपूरची खेळपट्टी फिरकीसाठी लाभदायी; दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची रणनीती काय असू शकते?
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकणारे फलंदाज
कानपूर कसोटीत कोहलीच्या निशाण्यावर असतील ‘हे’ २ मोठे विक्रम, दिग्गजांच्या यादीत होईल सामील