गुजरातकडून मिळालेल्या पराभवानंतर सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी याने युवा खेळाडूंनी पुढे येण्याची गरज बोलून दाखवली. त्याचसोबत एमएस धोनी असेही वाटते की, त्यांचा संघ गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागांमध्ये चांगले प्रदर्शन करू शकत होता. आयपीएल 2023च्या हा पहिलाच सामना होता, ज्यामध्ये हार्दिक पंड्या याच्या गुजरात टायटन्सने सीएसकेला 5 विकेट्सने मात दिली.
शुक्रवारी (31 मार्च) रोजी आयपीएल 2023 हंगाम सुरू झाला. पहिल्या सामन्यात गतविजेता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने होते. एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वात सीएसकेने आतापर्यंत चार आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. पण 2023 हंगामाची सुरुवात मात्र सीएसकेला अपेक्षित पद्धतीने करता आली नाही. सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 178 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने हे लक्ष्य 19.2 षटकात आणि 5 विकेट्सच्या नुकसानावर गाठले. सीएसके पराभूत झाली असली, तरी त्यांचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याचे प्रदर्शन कौतुकास्पद राहिले. कर्णधार धोनीने देखील ऋतुराजच्या फलंदाजीला दाद दिली.
ऋतुराजने या सामन्यात 50 चेंडूत 92 धावा केल्या. धोनी या सामन्यातील पराभवानंतर म्हणाला, “त्याठिकाणी दव पडणार आहेत, हे आम्हा सर्वांना माहिती होते. ऋतुराजचे सामन्यातील प्रदर्शन अप्रतिम होते. तो चेंडूला चांगल्या पद्धतीने टाईम करतो आणि त्याला खेळताना पाहून चांगले वाटते. त्याचे शॉट सिलेक्शन धेखील पाहण्यासारखे असते. माझ्या मते युवा खेळाडूंनी पुढे आले पाहिजे. मला वाटते राजवर्धन हंगरगेकरकडे गती आहे आणि तो दिवसेंदिवस सुधारणा करत आहे.” या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनी नो बॉल जास्त टाकले. याच पार्श्वभूमीवर संघातील गोलंदाजंना धोनीकडून सल्ला मिळाला.
धोनी पुढे म्हणाला की, “गोलंदाज चांगले असतील, तर नो बॉल देखील नियंत्रणात असतात. त्यामुळे या गोष्टीवर काम करण्याची गरज आहे. मला वाटले संघात दोन डावखुरे फलंदाज असले पाहिजे, त्यामुळे मी त्यांच्यासह सामन्यात उतरलो.” (What MS Dhoni said after losing the first match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंड्यालाही भरली पुणेकर ऋतुराजची धडकी; विजयानंतर म्हणाला, ‘असं वाटत होतं आम्ही त्याला…’
चेन्नईकडून आयपीएलमध्ये पदार्पणात प्रभावी कामगिरी करणाऱ्या हंगरगेकरसाठी धाराशिवच्या आमदाराची खास पोस्ट, ‘आई तुळजाभवानी…’