भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत जबरदस्त प्रदर्शन केले. तो टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला होता. तसेच, तो भारताकडून अशी कामगिरी करणारा विराट कोहली याच्यानंतरचा दुसरा फलंदाज होता. त्याने 6 सामन्यात 239 धावा चोपल्या होत्या. सूर्यकुमारच्या या फटकेबाजीवर कौतुकाचा वर्षाव झाला होता. आता न्यूझीलंडचा विस्फोटक फलंदाज ग्लेन फिलिप्स हादेखील सूर्यकुमारच्या फलंदाजीचा चाहता बनला. ग्लेन फिलिप्सचे सूर्यकुमार यादवबद्दल वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) याने सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याची प्रशंसा केली. त्याने शनिवारी (दि. 19 नोव्हेंबर) सूर्यकुमारबद्दल बोलताना म्हटले की, “तो आपले स्वप्नातही या भारतीय दिग्गजाप्रमाणे शानदार शॉट खेळू शकत नाही.” सूर्यकुमार टी20 क्रमवारीत जगातील अव्वल फलंदाज आहे. तसेच, भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध बे ओव्हल मैदानावर उतरेल, तेव्हा त्यांच्यापुढे फिलिप्सला रोखण्याचे आव्हान असेल. फिलिप्सनेही याच मैदानावर 46 चेंडूत शतक झळकावले आहे.
फिलिप्सने माध्यमांशी बोलताना म्हटले की, “तो (सूर्यकुमार) खरंच अविश्वसनीय आहे. तो ज्या गोष्टी करतो, मी ते स्वप्नातही करू शकत नाही. मला प्रयत्न करणे चांगले वाटेल, पण माझा खेळ त्याच्यापेक्षा खूपच वेगळा आहे. मनगटाच्या ताकदीने षटकार लावण्याची क्षमता त्याला खास बनवते. त्याच्यासारखी प्रतिभा तुम्ही क्वचितच पाहाल.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “माझ्याकडे माझी ताकद आहे. तसेच, त्याच्याकडे त्याची ताकद आहे. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आमचे काम करतो. ज्याप्रकारे आम्ही दोघे खेळतो, त्याने प्रतिस्पर्धी संघांना आम्हाला बाद करण्याची संधी मिळते. हा टी20मधील जोखीम आणि बक्षीसाचा भाग आहे.”
सूर्यकुमार यादवची कामगिरी
सूर्यकुमार यादव याने या कॅलेंडर वर्षात 43च्या सरासरीने आणि 186च्या शानदार स्ट्राईक रेटने 1040 धावा चोपल्या आहेत. तो यावर्षी टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. फिलिप्स हा आयसीसीच्या फलंदाजी क्रमवारीत आठव्या स्थानी आहे. त्याने यादरम्यान 158पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने 650 धावा चोपल्या आहेत. (what suryakumar yadav does i can’t even dream of doing says glenn phillips)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनी ते युवराज, ‘हे’ 5 दिग्गज भारतीय बनू शकत नाहीत टीम इंडियाचे निवडकर्ते; पण का?
क्रिकेट विश्वचषकाची बक्षीस रक्कम फुटबॉल वर्ल्डकपच्या तुलनेत पाणी कम चाय! आकडा वाचून येईल आकडी