भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा गेल्या काही महिन्यांपासून मोठी खेळी खेळण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहे. इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात देखील त्याला चांगली सुरुवात मिळाली होती. परंतु, तो पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. त्याला इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सन याने बाद करत माघारी धाडले. तसेच पहिल्या दिवसाचा खेळ झाल्यानंतर ऑली रॉबिन्सन याने विराटला बाद करण्यासाठी कुठल्या रणनीतीचा अवलंब केला होता, याचा खुलासा केला आहे.
रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा बाद होऊन माघारी परतल्यानंतर विराट कोहली फलंदाजी करण्यासाठी आला होता. कोहलीने संथ गतीने फलंदाजी करत केएल राहुलला चांगली साथ दिली. दोघांनी मिळून शेवटच्या सत्रापर्यंत फलंदाजी केली. केएल राहुलला शतक झळकवण्यात यश आले. तर चांगली फलंदाजी करत असलेल्या विराट कोहलीला ४२ धावांवर माघारी परतावे लागले होते.
डावातील ८५ व्या षटकात ऑली रॉबिन्सन अप्रतिम चेंडू टाकला, ज्यावर विराट कोहलीने ररक्षात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो चेंडू बॅटचा कड घेत स्लीपमध्ये असलेल्या रुटच्या हातात गेला आणि तो बाद झाला.(What was England’s planning to take Virat kohli’s wicket,ollie Robinson revealed)
काय होती रणनिती?
पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर ऑली रॉबिन्सन म्हणाला, “विराट माझी आतापर्यंतचा सर्वात मोठी विकेट आहे, यामुळे मला खूप आनंद होत आहे. हा खूप मोठा क्षण आहे. त्याच्याविरुद्ध खेळताना आमची रणनिती चौथ्या स्टंपच्या लाईनवर बॅक ऑफ लेंथ गोलंदाजी करण्याची होती. नशिबाने ही रणनिती यशस्वी ठरली.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मला वाटते की, आम्ही चांगली गोलंदाजी केली. खरं सांगायचं झालं तर त्यांनी खूप चांगली फलंदाजी केली. हा दिवस त्या दिवसांपैकी एक होता, ज्यामध्ये भारतीय फलंदाजांच्या बॅटचा कडाला चेंडू लागला नाही.”
या सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३६४ धावा केल्या, तर इंग्लंडने दुसऱ्या दिवसाखेर ३ बाद ११९ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
लॉर्ड्स कसोटीत १४ धावा करताच रूटची ‘मोठ्या’ विक्रमाला गवसणी, आता केवळ कूक आहे पुढे
Video: पहिल्या दिवशी इंग्लिश गोलंदाजांचा घाम काढणाऱ्या केएल राहुलचा ऑली रॉबिन्सनने असा काढला काटा
Video: पहिल्या दिवशी इंग्लिश गोलंदाजांचा घाम काढणाऱ्या केएल राहुलचा ऑली रॉबिन्सनने असा काढला काटा






