जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यांमध्ये पहिल्या आणि चौथ्या दिवशी पावसाने घोळ घातला होता. परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी सामना खेळवण्यात आला. यानंतर पाचव्या दिवशी चुरशीचा सामना झाला. परंतु न्यूझीलंड भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडून उत्कृष्ट फलंदाजीची अपेक्षा होती. परंतु विराटला पहिल्या डावामध्ये धावा बनवण्यात यश मिळाले. पण दुसऱ्या डावात महत्वाच्या वेळेस तो अवघ्या 13 धावांवर तंबूत परतला. या सामन्यादरम्यान दोन्ही डावांमध्ये विराटला न्यूझीलंडच्या युवा गोलंदाज काईल जेमिसनने बाद केले होते. यावर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी विराटकडून कुठे चूक झाली आणि तो कशाप्रकारे बाद झाला हे सांगितले आहे. (What will be the reason for Indian captain Virat Kohli to be twice dismissed by Jamison in the WTC match)
इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन म्हणाले की, “जेमिसनने जवळजवळ 2014 मधील आठवण करून दिली. त्याने त्याच लाईनमध्ये गोलंदाजी केली, ज्याप्रकारे 2014 मध्ये जेम्स एँडरसनने त्याच्यासाठी अडचणी निर्माण करण्यासाठी केली होती. विराट मागील दौऱ्यामध्ये जेव्हा इंग्लंडमध्ये होता, तेव्हा या प्रकारचे सर्व चेंडू त्याने सोडून दिले होते.”
Kyle Jamieson gets the massive scalp of Virat Kohli!
The Indian captain is out for 44.
???????? are 149/4.
#WTC21 Final | #INDvNZ | https://t.co/IvsdXSZmbs pic.twitter.com/j8dJTqbaBm
— ICC (@ICC) June 20, 2021
साऊथम्पटन कसोटी सामन्यातील पहिल्या डावात विराट 44 धावा बनवत जेमिसनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात विराट 13 धावा बनवत जेमिसनच्याच गोलंदाजीवर यष्टीरक्षक बीजे वॉटलिंगच्या हातात झेल देऊन बाद झाला. दोन्ही डावांमध्ये एकाच गोलंदाजाविरुद्ध विराट बाद झाला. भारतीय संघाने पहिल्या डावात 217 धावा केल्या होत्या. हे आव्हान न्यूझीलंड संघाने 249 धावा करत पूर्ण केले. यानंतर भारताचा दुसरा डाव १७० धावांवर संपुष्टात आला. हे आव्हान पार करत न्यूझीलंडने सामना खिशात घातला.
Kyle Jamieson dismisses Virat Kohli for the second time in the match ????
???????? are 71/3, leading by 39 runs. #WTC21 Final | #INDvNZ | https://t.co/rXqq6CU0zs pic.twitter.com/y9eVfqcFGi
— ICC (@ICC) June 23, 2021
जेमिसनच्या गोलंदाजीवर विराट बाद झाल्यानंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी त्याची कुठे चूक झाली हे सांगितले. सुनील गावस्कर म्हणाले की, “विराटच्या मागच्या पायाची जरा देखील हलचाल झाली नाही आणि तो हा शॉट खेळण्यासाठी गेला.”
न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला पराभूत करत पहिल्या वहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेवर आपले नाव कोरले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सचिन ठरला २१ व्या शतकातील सर्वात महान कसोटी फलंदाज; ‘या’ दिग्गजाला मागे टाकत पटकावला मान
…अन् चाहत्यांचे सेलिब्रेशन क्षणात बदलले निराशेत, पाहा कॅमेरामनने टिपलेला भन्नाट व्हिडिओ






