भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गाबा कसोटीनंतर त्यानं आपला निर्णय सर्वांना सांगितला. अश्विननं 2010 मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. लवकरच तो तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचा आघाडीचा फिरकी गोलंदाज बनला. आता अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो पुढे काय करणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे देतो.
(1) आयपीएलसह इतर लीगमध्ये खेळणार – अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. आयपीएल 2025 च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जनं त्याला 9.75 कोटी रुपयांना खरेदी केलं. अश्विननं चेन्नईकडूनच आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. आता त्याची घरवापसी झाली आहे. अश्विन आयपीएल व्यतिरिक्त तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये खेळू शकतो. याशिवाय तो रणजी ट्रॉफीसह इतर देशांतर्गत स्पर्धांमध्येही खेळताना दिसेल.
(2) कॉमेंट्री करू शकतो – रविचंद्रन अश्विनचं एक यूट्यूब चॅनल आहे. त्यावर तो खूप सक्रिय असतो. तिथे तो क्रिकेटपटूंच्या मुलाखती घेतो. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मुक्त झाल्यानंतर अश्विन कॉमेंट्री बॉक्समध्येही दिसू शकतो. त्याला क्रिकेटची खूप जाण आहे. तो एक चांगला वक्ताही आहे. त्यामुळे तो कमेंटेटर बनू शकतो.
(3) क्रिकेट अकादमीला वेळ देणार – रविचंद्रन अश्विन एक क्रिकेट अकादमी चालवतो. त्याच्या अकादमीचं नाव ‘जेन नेक्ट क्रिकेट अकादमी’ आहे. अश्विनची ही अकादमी चेन्नईत आहे. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं कोणतंही दडपण नसल्यामुळे तो अकादमीसाठी अधिक वेळ देऊ शकतो. यासोबतच तो इतर ठिकाणीही आपली अकादमी उघडू शकतो.
(4) चेस टीमचा मालक आहे – ग्लोबल चेस लीगचा पहिला हंगाम 2023 मध्ये खेळला गेला. यामध्ये रविचंद्रन अश्विननं अमेरिकन गॅम्बिट्स संघ विकत घेतला, जो दुसऱ्या हंगामात सहभागी होणारा नवीन संघ आहे. ग्लोबल चेस लीग ही टेक महिंद्रा आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ यांच्या संयुक्त मालकीची लीग आहे.
(5) कोचिंगमध्येही हात आजमावू शकतो – रविचंद्रन अश्विन कोचिंगमध्येही हात आजमावू शकतो. त्याला क्रिकेटची खूप समज आहे. तो आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोचिंग करू शकतो.
हेही वाचा –
मेलबर्न विमानतळावर राडा! विराट कोहलीला राग अनावर; नेमकं काय घडलं?
पुढचा नंबर विराटचा? अश्विनच्या निवृत्तीनंतर कोहली 2011 च्या वर्ल्ड चॅम्पियन संघाचा एकमेव सक्रिय खेळाडू
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथी कसोटी मेलबर्नमध्ये, बाॅक्सिंग डे टेस्टमध्ये टीम इंडियाचा विक्रम कसा?