आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने क्रिकेटमधून निवृत्ती जवळपास ७ वर्ष झाली. तब्बल २४ वर्ष सचिनने भारताकडून क्रिकेट खेळले.
परंतु हाच सचिन वयाच्या १३व्या वर्षा पाकिस्तानकडून क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला होता, असे कुणी सांगितले तर आश्चर्य वाटेल.
सचिनने १५ नोव्हेंबर १९८९ रोजी इम्रान खानच्या पाकिस्तानविरुद्ध कराचीला आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. परंतु याच इम्रान खानच्या नेतृत्वाखाली सचिन २० जानेवारी १९८७ रोजी खेळला होता.
तेव्हा क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे ब्रेबाॅन स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान हा प्रदर्शनीय सामना आयोजित केला होता. हा सामना ४० षटकांचा होता.
या प्रदर्शनीय सामन्यानंतर भारतीय संघ भारतातच पाकिस्तानविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार होता. ही तीच मालिका होती ज्यात सुनिल गावसकर यांनी क्रिकेटला अलविदा केले होते.
तर या ब्रेबाॅनवरील प्रदर्शनीय सामन्याच्या वेळी सचिनचे वय केवळ १३ महिने आणि ९ महिने होते. जेव्हा सचिनला क्षेत्ररक्षणाची संधी मिळाली तेव्हा तो खूप आनंदी झाला होता.
तेव्हा पाकिस्ताने काही खेळाडू सामना सुरु असतानाच विश्रांतीसाठी हाॅटेलवर गेले होते. पाकिस्तानचा कर्णधार इम्रान खानने तेव्हा सीसीआयचे कर्णधार असलेल्या हेमंत केंक्रेना विनंती केली की त्यांच्याकडे क्षेत्ररक्षकांची कमी आहे. त्यामुळे तूमच्याकडील दोन- तीन खेळाडू आम्हाला क्षेत्ररक्षणासाठी द्या.
यावेळी सचिनने क्रेंकेंना विचारले की, मी जाऊ का?. त्यांच उत्तर येईपर्यंत सचिन मैदानात दाखल झाला होता.
त्यावेळी तिथे जवळपास असलेल्या खुश्रू वसानिया आणि सचिन तेंडूलकरला पाकिस्तानकडून क्षेत्ररक्षणासाठी मैदानात संधी मिळाली.
जेव्हा सामना संपला तेव्हा सचिनने जवळपास २५ मिनीटं पाकिस्तानकडून क्षेत्ररक्षण केलं होतं.
यावेळी सीसीआयच्या ड्रेसिंग रुमची जबाबदारी हेमंत केंक्रे आणि तेव्हाचे मुंबईचे फलंदाज शिरिष हट्टंगडीकडे होती. त्यांनी अब्दुल कादीर आणि जावेद मियाॅंदादला हाॅटेलकडे जाताना पाहिले.
जेव्हा त्यांना राखीव खेळाडूंसाठी विचारणा झाली तेव्हा त्यांनी पहिली पसंती खुश्रू वसानियाला दिली होती. हा तोच खेळाडू होता ज्याला १९८२-८३ला बेस्ट ज्युनियर क्रिकेटरची शांतीबाई सेठ ट्राॅफी मिळाली होती. तेव्हा तो भारताच्या अंडर १९ संघात खेळत असे. तो सचिनला बराच सिनियर होता. तसेच एक प्रतिभावान खेळाडू होता. सध्या हा खेळाडू अमेरिकेत स्थायिक झाला आहे.
तेव्हा खुश्रू वसानियाला ऑफ साईडला तर सचिनला लेग साईडला क्षेत्ररक्षणाची संधी मिळाली होती. या सामन्यानंतर सचिन खूपच नाराज झाला होता. कारण त्याच्याकडे काही झेल आले होते परंतु त्याला ते घेता आले नव्हते. याचे कारण म्हणजे ते खूपच उंचीवरुन गेले होते आणि सचिनला ते पकडणे शक्यच नव्हते.
याच सामन्यानंतर सचिनने घरी जाताना शेवटच्या वेळी मुंबई लोकलने प्रवास केला. त्यानंतर काही महिन्यांत मुंबईकडून तर २ वर्षांनी बरोबर टीम इंडियाकडून २४ वर्षांच्या प्रवासाला सुरुवात झाली.
अन्य वाचनीय लेख-
– तेव्हा सचिनच्या आईने पाहिला होता सचिन खेळलेला पहिला आंतरराष्ट्रीय सामना
– सचिन नाही तर हे आहेत लाॅर्ड्सवर शतक करणारे ५ मराठमोळे मुंबईकर क्रिकेटपटू
–सचिनच्या नावावर जरी धावा असल्या तरी हटके विक्रम आहेत कूकच्याच नावावर