---Advertisement---

…आणि १३ वर्षांचा सचिन झाला चक्क पाकिस्तानचा क्षेत्ररक्षक

On: शनिवार, नोव्हेंबर 16, 2019 10:37 AM
---Advertisement---

आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेवुन ६ वर्ष झाली. तब्बल २४ वर्ष सचिनने भारताकडून क्रिकेट खेळले.

परंतु हाच सचिन वयाच्या १३व्या वर्षा पाकिस्तानकडून क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला होता, असे कुणी सांगितले तर आश्चर्य वाटेल.

सचिनने १५ नोव्हेंबर १९८९ रोजी इम्रान खानच्या पाकिस्तानविरुद्ध कराचीला आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. परंतु याच इम्रान खानच्या नेतृत्वाखाली सचिन २० जानेवारी १९८७ रोजी खेळला होता.

तेव्हा क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे ब्रेबाॅन स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान हा प्रदर्शनीय सामना आयोजित केला होता. हा सामना ४० षटकांचा होता.

या प्रदर्शनीय सामन्यानंतर भारतीय संघ भारतातच पाकिस्तानविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार होता. ही तीच मालिका होती ज्यात सुनिल गावसकर यांनी क्रिकेटला अलविदा केले.

तर या ब्रेबाॅनवरील प्रदर्शनीय सामन्याच्या वेळी सचिनचे वय केवळ १३ वर्षे आणि ९ महिने होते. जेव्हा सचिनला क्षेत्ररक्षणाची संधी मिळाली तेव्हा तो खूप आनंदी झाला होता.

तेव्हा पाकिस्ताने काही खेळाडू सामना सुरु असतानाच विश्रांतीसाठी हाॅटेलवर गेले होते. पाकिस्तानचा कर्णधार इम्रान खानने तेव्हा सीसीआयचे कर्णधार असलेल्या हेमंत केंक्रेना विनंती केली की त्यांच्याकडे क्षेत्ररक्षकांची कमी आहे. त्यामुळे तूमच्याकडील दोन- तीन खेळाडू आम्हाला क्षेत्ररक्षणासाठी द्या.

यावेळी सचिनने क्रेंकेंना विचारले की, मी जाऊ का?. त्यांच उत्तर येईपर्यंत सचिन मैदानात दाखल झाला होता.

त्यावेळी तिथे जवळपास असलेल्या खुश्रू वसानिया आणि सचिन तेंडूलकरला पाकिस्तानकडून क्षेत्ररक्षणासाठी मैदानात संधी मिळाली.

जेव्हा सामना संपला तेव्हा सचिनने जवळपास २५ मिनीटं पाकिस्तानकडून क्षेत्ररक्षण केलं होतं.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---