आयपीएलच्या 17 व्या महाकुंभाला आता काउंटडाऊन सुरु झालं आहे. मात्र त्याआधी काहीतास सीएसकेने मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात खेळण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स सज्ज झाला आहे. तर फाफ डु प्लेसिस याच्या कॅप्टन्सीत आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा संपवण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची टीम पहिल्या सामन्यात मैदानावर उतरणार आहे. तसेच एसके विरुद्ध आरसीबी या संघांमध्ये यंदाच्या हंगामातील सलामीचा सामना होणार आहे. यासाठी हा सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहता येणार? हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
याबरोबरच IPL 2024 चा सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. तर हा सामना उद्या म्हणजेच 22 मार्च रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. तसेच या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. सीएसके विरुद्ध आरसीबी सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येईल. तसेच सीएसके विरुद्ध आरसीबी सामना मोबाईलवर फुकटात जिओ सिनेमा एपवर बघायला मिळणार आहे.
दरम्यान, आयपीएल 2024 मध्ये सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या सीएसकेने मोठा निर्णय घेतला आहे. माही आता चाहत्यांना कॅप्टन म्हणून दिसणार नाही. तसेच एम एस धोनीच्या नेतृत्त्वामध्ये 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये सीएसकेने आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. सीएसके आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांनी सर्वाधिक ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत ऋतुराज गायकवाड आणि चेन्नईचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
आयपीएल 2024 साठी सीएसकेचा संघ पुढीलप्रमाणे : ऋतुराज गायकवाड, (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, मोईन अली, दीपक चाहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिशेल सेंटनर, सिमरजीत सिंह, निशांत सिंधु, प्रशांत सोलंकी, महेश तीक्षना, रचीन रवींद्र, शार्दूल ठाकुर, डेरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान आणि अवनीश राव अरावली.
आयपीएल 2024 साठी आरसीबीचा संघ पुढीलप्रमाणे : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन) यश दयाल, रीस टोपले, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, हिमांशू शर्मा, राजन कुमार, मोहम्मद सिराज, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार वायझॅक, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, विल जॅक्स, कॅमरन, कॅमरन, मोहम्मद सिराज, मनोज भंडागे, आकाश दीप, रजत पाटीदार, विराट कोहली, दिनेश कार्तिक, सौरव चौहान आणि अनुज रावत.
महत्त्वाच्या बातम्या-
- मराठमोळ्या ऋतुराजची कर्णधार होताच पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाला,’ मला फार काही…
- धोनी कर्णधारपदावरून पायउतार होताच विराट कोहलीची प्रतिक्रिया तुफान व्हायरल