भारत आणि नामिबिया या दोन्ही संघांमध्ये सोमवारी (८ नोव्हेंबर) आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेतील ४२ वा सामना पार पडणार आहे. भारत आणि नामिबिया हे दोन्ही संघ आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. त्यामुळे हा सामना एक औपारिकता असणार आहे.
या सामन्यात नामिबिया संघाला भारतीय संघासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध खेळण्याचा अनुभव घेण्याची संधी असणार आहे. तर कर्णधार विराट कोहलीचा हा टी -२० संघाचा कर्णधार म्हणून शेवटचा सामना असणार आहे. तसेच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांचा देखील हा अखेरचा सामना आहे. या सामन्यानंतर त्यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे.
अफगानिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात अफगानिस्तान संघ पराभूत झाल्यामुळे भारतीय संघाचे उपांत्य फेरीत जाण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.
टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील भारत विरुद्ध नामिबिया सामन्याचे तपशील
केव्हा होईल टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील भारत विरुद्ध नामिबिया यांच्यातील सामना?
टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील भारत विरुद्ध नामिबिया यांच्यातील सामना सोमवारी (८ नोव्हेंबर ) खेळला जाणार आहे.
किती वाजता सुरू होईल टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील भारत विरुद्ध नामिबिया यांच्यातील सामना?
टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील नामिबिया विरुद्ध भारत या दोन्ही संघांमधील सामना भारतीय वेळेनुसार ७:३० वाजता सुरू होईल. तर नाणेफेक ७:०० वाजता होईल.
कुठे खेळला जाईल टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील भारत विरुद्ध नामिबिया यांच्यातील सामना?
टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील भारत विरुद्ध नामिबिया यांच्यातील सामना दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडणार आहे.
कुठे पाहू शकाल टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील भारत विरुद्ध नामिबिया यांच्यातील सामन्याचे लाईव्ह प्रसारण?
टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील भारत विरुद्ध नामिबिया यांच्यातील सामन्याचे लाईव्ह प्रसारण तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या चॅनलवर पाहू शकता. तसेच जर तुमच्याकडे सबस्क्रीप्शन असेल तर, तुम्ही सामना डीस्नी + हॉटस्टार ऍपवर देखील पाहू शकता. यासह सामन्याचे लाईव्ह अपडेट तुम्ही www.mahasports.in वर मिळवू शकतात.
अशी असू शकते भारतीय संघाची संभावित प्लेइंग ११
केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत (यष्टिरक्षक) रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, राहुल चहर आणि वरुण चक्रवर्ती.
अशी असू शकते नामिबिया संघाची प्लेइंग ११
स्टीफन बार्ड, मायकेल व्हॅन लिंजेन, क्रेग विल्यम्स, गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), डेव्हिड विसे, जेजे स्मित, जॅन निकोल लोफ्टी-ईटन, झेन ग्रीन (यष्टिरक्षक), जॅन फ्रायलिंक, रुबेन ट्रम्पेलमन आणि बेन शिकोंगो.
महत्त्वाच्या बातम्या –
गेल्या ९ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतावर ओढावली ही नामुष्की, उपांत्य फेरीपर्यंतही मारता आली नाही मजल