अखेर क्रिकेट चाहत्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम लागणार आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या ऐतिहासिक सामन्यासाठी भारतीय संघ कसून सराव करण्यात व्यस्त आहे, तर न्यूझीलंड संघाने नुकतेच इंग्लंड संघाला २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १- ० ने पराभूत केले आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात क्रिकेट चाहत्यांना चुरशीची लढत पाहायला मिळेल, यात कोणतीच शंका नाही. अशा या हाय होल्टेज, बहुचर्चित सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण कुठे आणि कसे पाहायला मिळेल याबद्दल जाणून घेऊयात.(When and where to watch India vs newzealand world Test championship final)
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड या दोन बलाढ्य संघामध्ये खेळला जाणार आहे. हा सामना साउथॅम्प्टनच्या एजस बाऊल स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.
किती वाजता सुरू होणार सामना?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना, भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होणार आहे. तसेच नाणेफेक ३ वाजता होणार आहे.
कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल हा सामना?
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण इंग्रजीमध्ये स्टार स्पोर्ट्स १ आणि स्टार स्पोर्ट्स १ एचडीवर तसेच हिंदीमध्ये स्टार स्पोर्ट्स हिंदी आणि स्टार स्पोर्ट्स हिंदी एचडीवर पाहता येईल.
ऑनलाईनही पाहू शकता सामना
या मोठ्या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही ऑनलाईनही पाहू शकता. तुम्ही हॉटस्टार आणि जिओ टीव्हीवर हा सामना पाहू शकता.
आयसीसीनुसार जगभरातील प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेऊ शकणार आहेत. हा सामना टीव्ही, डिजिटल आणि रेडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे. तसेच स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर हा सामना हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड या भाषेत पाहता येणार आहे. तसेच फेसबुकवरही हा सामना पाहता येणार आहे.
न्यूझीलंडमध्ये हा सामना स्काय स्पोर्ट्स, ऑस्ट्रेलियामध्ये फॉक्स स्पोर्ट्स, दक्षिण आफ्रिकेत सुपर स्पोर्ट्स आणि इंग्लंडमध्ये स्काय स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येणार आहे.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारताचा १५ सदस्यांचा संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धिमान साहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लिशसह ‘या’ भारतीय भाषांमध्ये होणार WTC Final चे थेट प्रसारण; मराठीचा मात्र समावेश नाही
अरेरे! पावसात ‘हेलिकॉप्टर शॉट’ मारताना खेळाडूचे जमिनीवर लोटांगण, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
कशी झाली होती रितिकासोबत भेट अन् काय होती युवराजची धमकी? रोहित शर्माने केला उलगडा