भारतीय संघाला मंगळवार, 4 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना खेळायचा आहे. भारताने या मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना जिंकला आहे आणि मालिका देखील नावावर केली आहे. तिसरा सामना जिंकल्यानंतर पाहुण्या आफ्रिकी संघाला भारत क्लीन स्वीप देईल. उभय संघातील तिसरा सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जाईल.
टी-20 मालिकेतील पहिला सामना तिरुवानंतपुरममध्ये खेळला गेला होता, जो भारताने 8 धावांनी जिंकला. त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटीमध्ये खेळला गेला आणि भारताने या सामन्यात 16 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा भारताने मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका जिंकली आहे. यापूर्वी जेव्हा कधी आफ्रिकी संघाने भारतात टी-20 मालिका खेळली होती, तेव्हा ती जिंकली किंवा बरोबरीने सोडवली होती. चला तर सामन्याविषयी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊ, ज्यामुळे तुम्हीही या शेवटच्या टी-20 सामन्याचा आनंद घेऊ शकाल.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी-20 सामना केव्हा आणि कुठे खेळला जाईल?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-20 सामना 4 ऑक्टोबर रोजी इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्याची नाणेफेक 6 वाजता होईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 सामना कोणत्या वेळेला सुरू होईल?
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांतील तिसरा टी-20 सामना भारतीय वेळेनुसार रात्री सात वाजता सुरू होईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा सामना लाईव्ह कुठे पाहायचा?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी-20 सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहायला मिळेल. सोनीच्या वेगेवेगळ्या चॅनलवर सामना पाहायला मिळू शकतो. तसेच समालोचकांची भाषा देखील आपण इच्छेनुसार निवडू शकतो. तसेच डीडी स्पोर्ट्सवर देखील या सामन्याचे लाईव्ह प्रसारण पाहायला मिळणार आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकी तिसरा टी-20 सामना ऑनलाईन कुठे पाहता येणार?
जर तुम्हाला हा सामना स्मार्टफोन, टॅबलेट किंवा स्मार्ट टीव्हीवर पाहायचा असेल, तर डिज्नी प्ले हॉटस्टारवर पाहता येईल. लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरून सामना पाहायचा असल्यास हॉटस्टारच्या बेवसाइटवर जाऊन ऑनलाइन स्ट्रीमिंगची मजा घेता येऊ शकते. दरम्यान, भारतीय संघाचे प्रमुख फलंदाज विराट कोहली आणि केएल राहुल यांना आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात खेळणार नाहीये.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
गोलंदाजांना घाम फोडणारा बेअरस्टो उभा राहण्यासाठी करतोय संघर्ष; कारकीर्दीबाबत म्हणाला, ‘आता बस…’
स्पेशल बड्डे! वाढदिवसाचं औचित्य साधून रिषभ पंतला गर्लफ्रेंडकडून भन्नाट गिफ्ट