पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले २ सामने पार पडल्यानंतर इंग्लंड आणि भारत संघ आता तिसरा सामना खेळतील. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत राहिली होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडवर १५१ धावांनी विजय मिळवला होता. यासह भारतीय संघ कसोटी मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. आता तिसरा सामना जिंकत आपली विजय घोडदौड कायम राखण्यासाठी विराटसेना प्रयत्नशील असेल. तर जो रुटच्या नेतृत्त्वाखालील इंग्लंडचा संघ भारताची लय तोडत मालिका बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल.
इंग्लंड विरुद्ध भारत तिसरा कसोटी सामना कुठे आणि केव्हा होणार?
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना २५ ते २९ ऑगस्टदरम्यान होणार आहे. हा सामना लीड्स येथील हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत तिसरा कसोटी सामना किती वाजता सुरू होणार?
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होणार आहे. तत्पूर्वी उभय संघात ३ वाजता नाणेफेक होईल.
इंग्लंड विरुद्ध भारत तिसरा कसोटी सामना भारतात टिव्हीवर कसा पाहाल?
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या हिंदी आणि इंग्रजी चॅनल्सवर पाहता येईल.
इंग्लंड विरुद्ध भारत तिसरा कसोटी सामना भारतात ऑनलाईन कसा पाहाल?
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना भारतात ऑनलाईन सोनी लिव्ह ऍपवर पाहता येईल.
असा असू शकतो भारताचा संभाव्य संघ
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
असा असू शकतो इंग्लंडचा संभाव्य संघ
रॉरी बर्न्स, हसीब हमीद, डेविड मलान, जो रूट, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर (यष्टीरक्षक), मोईन अली, सॅम करन, ऑली रॉबिन्सन, जेम्स अंडरसन, साकिब महमूद.
महत्त्वाच्या बातम्या-
सूर्या-पृथ्वीची ‘३६० डिग्री’ फटकेबाजी पाहण्याची सर्वांनाच आतुरता, पण नेमकं कोणाच्या जागी खेळवणार?
तिसऱ्या कसोटीत ‘टेस्ट स्पेशलिस्ट’ पुजाराचा कटणार पत्ता? उपकर्णधार रहाणेने दिले ‘असे’ संकेत
हेडिंग्ले कसोटीत इंग्लंडकडून ‘हे’ २ नवीन खेळाडू मैदानात उतरणार, कर्णधार रूटने दिले संकेत