टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत बुधवारी (३ ऑक्टोबर) भारत आणि अफगाणिस्तान या दोन संघात रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना शेख झायेद स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे.
टी२० विश्वचषकात भारतीय संघाला आद्याप अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. भारतीय संघाला टी२० विश्वचषकातील त्यांच्या पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे हा तिसरा सामना संघासाठी अत्यांत महत्वाचा बनला आहे. भारताला स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याची आशा कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे असणार आहे. हा सामना भारताने जिंकल्यास भारताच्या उपांत्य फेरीतील आशा जिवंत राहाणार आहेत. मात्र, हा सामना पराभूत झाल्यास भारताचे आव्हान संपुष्टात येईल.
टी२० विश्वचषक २०२१ मधील भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. टी२० विश्वचषक २०२१ मधील भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना कधी खेळला जाणार आहे?
– टी२० विश्वचषक २०२१ मधील ३३ व्या सामन्यात भारत विरुद्ध अफगाणिस्तान ३ नोव्हेंबर रोजी आमने-सामने असतील.
२. टी२० विश्वचषक २०२१ मधील भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना कुठे खेळला जाणार ?
– टी२० विश्वचषक २०२१ मधील भारत आणि अफगाणिस्तान या दोन संघांतील सामना अबु धाबी स्थित शेख झायेद स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
३. टी२० विश्वचषक २०२१ मधील भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना किती वाजता सुरु होईल?
– टी२० विश्वचषक २०२१ मधील भारत आणि अफगाणिस्तान सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघाचे कर्णधार संध्याकाळी ७.०० वाजता मैदानावर उपस्थित असतील.
४. टी२० विश्वचषक २०२१ मधील भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याचे लाइव्ह टेलीकास्ट कुठे पाहायला मिळणार ?
– टी२० विश्वचषक २०२१ मधील भारत आणि अफगाणिस्तान सामन्याचे लाइव्ह टेलीकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहायला मिळणार आहे.
५. टी२० विश्वचषक २०२१ मधील भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याची ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहायला मिळणार?
-टी२० विश्वचषक २०२१ मधील भारत आणि अफगाणिस्तान सामन्याची ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार या ऍपवर पाहायला मिळणार आहे.
यातून निवडले जातील ११ जणांचे संघ –
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ईशान किशन (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती आणि सूर्यकुमार यादव.
अफगाणिस्तान संघ : मोहम्मद नबी (कर्णधार), असगर अफगान, फरीद अहमद, गुलाबदीन नायब, हामिद हसन, हश्मतुल्लाह शहीदी, हजरतुल्लाह जजई, करीम जन्नत, मोहम्मद शहजाद (यष्टीरक्षक), मुजीब उर रहमान, नजीबुल्लाह जादरान, नवीन-उल-हक, रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), राशिद खान आणि उस्मान गनी.
महत्त्वाच्या बातम्या –
जोडी नंबर १! रोहित-शिखरच्या जोडीला भारी ठरली आझम-रिझवानची जोडी, ‘या’ यादीत मिळवले अव्वल स्थान
‘ब्रेकअप झालाय का?’ शुबमन गिलच्या ‘या’ पोस्टमुळे चर्चेला उधाण
टी२०मध्ये बाबर आझम ‘कर्णधार’ विराट कोहलीला ठरतोय सरस, आता ‘या’ विक्रमात दिला धोबीपछाड