---Advertisement---

दिल्ली प्लेऑफमधून बाहेर होताच, मुंबईचा चारवर्षांपूर्वीचा हिशोब चूकता, वाचा नक्की काय झालेलं

On: रविवार, मे 22, 2022 3:28 PM
Rohit-Sharma-Rishabh-Pant
---Advertisement---

मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ६९ वा सामना प्लेऑफमधील चौथा संघ ठरवण्यासाठी निर्णायक ठरला. हा सामना वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात मुंबईने ५ विकेट्सने विजय मिळवला. मुंबईच्या या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाचे आव्हान संपुष्टात आले, तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला मोठा फायदा झाला. बेंगलोर संघ आयपीएल २०२२ च्या प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरला. 

मुंबईने चारवर्षांपूर्वीचा हिशोब केला चूकता 
विशेष म्हणजे मुंबईने या सामन्यात विजय मिळवून दिल्लीला स्पर्धेतून बाहेर केले आहे, याबरोबरच मुंबईने दिल्लीबरोबरचा चार वर्षांपूर्वीच्या सामन्याचा बदला चूकता केला. मुंबई सध्या गुणतालिकेत अखेरच्या क्रमांकावर आहे आणि त्यांनी आता दिल्लीला पराभूत करत प्लेऑफमध्ये जाण्यापासून रोखले आहे. चार वर्षांपूर्वीदेखील अशीच घटना झाली होती. पण त्यावेळी दिल्ली कॅपिटल्सने मुंबईला स्पर्धेतून बाहेर केले होते.

साल २०१८ मध्ये (IPL 2018) दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर होते. त्यावेळी मुंबईला प्लेऑफमध्ये (IPL Playoffs) जाण्यासाठी एका विजयाची गरज होती. त्यावेळी दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला आपल्या घरच्या मैदानात ११ धावांनी पराभूत केले होते. त्यामुळे मुंबई इंडियन्सला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जावे लागले होते. आता चार वर्षांनंतर अशाचप्रकारे मुंबईने दिल्लीला बाहेर केले आहे.

मुंबईचा अखेरच्या सामन्यात विजय
शनिवारी झालेल्या या सामन्यात (Mumbai Indians vs Delhi Capitals) दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी २० षटकात ७ बाद १५९ धावा केल्या. दिल्लीकडून रोवमन पॉवेलने सर्वाधिक ४३ धावा केल्या. तसेच कर्णधार रिषभ पंतने ३९ धावा केल्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर १६० धावांचे आव्हान मुंबईने १९.१ षटकात पूर्ण केले. मुंबईकडून इशान किशनने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. तसेच डेवाल्ड ब्रेविसने ३७ धावा केल्या, तर टीम डेव्हिडने ११ चेंडूत ताबडतोड ३४ धावांची खेळी केली. दिल्लीकडून एन्रीच नॉर्किया आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. या सामन्यात विजय मिळवत मुंबईने हंगामाचा शेवट गोड केला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी लवकरच होणार टीमची घोषणा? ‘या’ नव्या खेळाडूंना मिळू शकते संधी

मस्ती आणि खूप सारा केक..! तेवतियाने गुजरात टायटन्सच्या खेळाडूंसंगे साजरा केला बर्थडे, पत्नीचीही हजेरी

‘अविश्वसनीय रूपाने फिट व्यक्ती आहे धोनी’, थालाच्या आयपीएल २०२३ खेळण्याच्या निर्णयावर बोलले शास्त्री

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---