---Advertisement---

‘जॉर्ज फ्लॉईडची हत्या झाल्यानंतर भारतीयांनीही शोक व्यक्त केला’, इरफानच्या ‘याॅर्कर’ ट्विटने वातावरण तापलं

---Advertisement---

दिल्लीमध्ये गेल्या 2 महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. त्यानंतर हरियाणातील अनेक जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. या कारवायांनंतर अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. त्यातच अनेक मोठ्या सेलिब्रेटींनी आता याबाबत प्रतिक्रिया दिल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळताना दिसून येत आहे.

जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. हा भारताचा अंतर्गत प्रश्न असुन त्यात भारताबाहेरील लोकांनी बोलू नये, असे अनेकांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

इरफानचा अप्रत्यक्ष टोला –

एकीकडे शेतकरी आंदोलनाला हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून त्यावर बाहेरच्या लोकांनी बोलू नये, अशा आशयाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत असतानाच भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणने अप्रत्यक्षरित्या अशा प्रतिक्रिया देणाऱ्यांना टोला लगावला आहे.

इरफानने ट्विट केले आहे की ‘जेव्हा अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयडची एका पोलिस कर्मचाऱ्याने निर्घृणपणे हत्या केली तेव्हा आपल्या देशाने आपले दुःख व्यक्त केले होते.’ या ट्विटपुढे त्याने ‘#justsaying’ असा हॅशटॅगही वापरला आहे. यातून असा कयास लावला जात आहे की इरफानला म्हणायचे असावे की जसे भारतातून अमेरिकेच्या अंतर्गत मुद्याबाबत मत व्यक्त केले जात होते, तसे भारतातील गोष्टीबाबतही होत आहे.

मागीलवर्षी मेमध्ये अमेरिकेत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयडची हत्या झाल्यानंतर वर्णभेदाविरुद्ध मोठ्या प्रमाणात जगभरातून आवाज उठवण्यात आला होता.

क्रिकेटपटूंचे शेतकरी अंदोलनाबाबत ट्विट –

अनेक भारतीय क्रिकेटपटूंनीही शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट करताना भारताला एकजूट राहण्याचा सल्ला दिला. यानंतर भारतीय क्रिकेटपटूंबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

अनेकांनी क्रिकेटपटूंविरुद्ध टीका केली आहे. गेल्या 2 महिन्यात हे क्रिकेटपटू नक्की कोठे होते, असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत. तसेच अनेक क्रिकेटपटूंचे ट्विट साधारण सारखे कसे असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

INDvsENG : ‘असा’ आहे चेन्नई कसोटीचा इतिहास; पाहा टीम इंडियाने जिंकले किती सामने

हार्दिक पंड्याचं प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणं कठीण, तरीही ‘या’ कारणामुळे केली कसोटी संघात निवड 

“भारताप्रती तुझं प्रेम पाहून आनंद वाटला”, पीटरसनच्या ट्विटवर मोदींची मन जिंकणारी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---