इंडियन प्रीमिअर लीगमध्ये एकापेक्षा एक गोलंदाज आपला दम दाखवताना दिसत आहेत. असाच एक गोलंदाज आहे, जो सर्वांनाच आपली दखल घ्यायला भाग पाडत आहे. तो खेळाडू म्हणजे हर्षल पटेल. खरं तर पटेलला खरी ओळख ही २०२१च्या हंगामात मिळाली होती. मागील हंगामात आपल्या गोलंदाजीने त्याने फलंदाजांना अक्षरश: घाम फोडला होता. तसेच, ३२ विकेट्स घेत पर्पल कॅपही आपल्या नावावर केली होती. यासोबतच त्याने एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या ड्वेन ब्रावोच्या विक्रमाची बरोबरी केली होती.
हर्षल पटेलने (Harshal Patel) आपल्या गोलंदाजीत अनेक महत्त्वपूर्ण पैलू जोडले आणि यातीलच एक विविधता त्याची संथ गतीचा चेंडू आहे. हा चेंडू फलंदाजांसाठी खूपच समस्या निर्माण करतो. आपल्या या गोलंदाजीने पटेलने विरोधी संघांच्या फलंदाजांसोबतच संघसहकाऱ्यांनाही नेट्समध्ये चांगलाच घाम फोडला आहे.
‘ते नाही मारू शकणार’
गौरव कपूरचा युट्यूब शो ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’वर बोलताना पटेलने सांगितले की, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स आणि विराट कोहली यांसारख्या टी२० स्टार खेळाडूंनी त्याच्या संथ गतीच्या चेंडूबद्दल प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “एबी, विराट आणि मॅक्सी यांनी म्हटले आहे की, माझ्या संथ चेंडूला हाताने समजणे अशक्य आहे. म्हणून मी मॅक्सीला काही संथ चेंडू टाकतो आणि तो नेटमधून बाहेर येतो आणि म्हणतो, ‘मित्रा, ते हा चेंडू मारू शकणार नाहीत.’ जेव्हा त्याच्यासारखे व्यक्ती विराट किंवा एबी म्हणतात, तेव्हा तुम्हाला वाटतं, ‘जर ते हाताने बघत नाहीयेत, तर दुसरे कोण करू शकेल?’ यामुळे आत्मविश्वास खूप वाढतो.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘मी झहीर खानकडून टी२०त गोलंदाजी करायला शिकलो’
हर्षल पटेलचा असा विश्वास आहे की, टी२० गोलंदाजाच्या रूपात सर्वोत्तम बनण्यासाठी त्याला भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानच्या मौल्यवान टिप्सची खूप मदत मिळाली. २०१२मध्ये जेव्हा पटेलने बेंगलोर संघाची साथ धरली, तेव्हा झहीर खानही त्याच संघाचा भाग होता. ३१ वर्षीय पटेलने सांगितले की, कशाप्रकारे झहीर खानमुळे त्याने आपल्या गोलंदाजीत सुधारणा केली. तो म्हणाला, “संथ चेंडूचा उत्तम वापर कोणी केला असेल, तर ते २०११च्या विश्वचषकामध्ये झहीर खान होता. त्या नकल चेंडूने त्याने ज्याप्रकारे लोकांना बाद केले ते पाहणे अविश्वसनीय होते. मी त्याच्याकडून टी२० गोलंदाजीचे धडे घेतले. मी २०१२मध्ये आरसीबीकडून सुरुवात केली आणि तो प्रत्येक चेंडूवर माझ्याकडे यायचा आणि मला काय गोलंदाजी करायची हे सांगायचा.”
“मला आठवते की, आम्ही पुण्यात खेळत होतो आणि त्यांनी मला सावकाश गोलंदाजी करू नको असे सांगितले, पण तरीही मी गोलंदाजी केली आणि रॉबिन उथप्पाने मला मिड-विकेटवर षटकार ठोकला. म्हणून तो माझ्याकडे आला आणि (हसत) इतर सर्व चर्चांमध्येच म्हणाला, ‘मी तुला बॉलिंग करू नकोस असे सांगितले होते ना?”
हर्षल पटेलने बेंगलोरसाठी वेगवान गोलंदाज म्हणून घेतल्या सर्वाधिक विकेट्स
हर्षल पटेलने बेंगलोर संघासाठी वेगवान गोलंदाज म्हणून आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने एकूण ७३ विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर विनय कुमार असून त्याने ७२ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, तिसऱ्या क्रमांकावर झहीर खान असून त्याने ४९ विकेट्स घेतल्या आहेत. मोहम्मद सिराज आणि श्रीनाथ अरविंद संयुक्तरीत्या ४५ विकेट्ससह चौथ्या क्रमांकावर आहेत.
Most wkts by a fast bowler for RCB in IPL
*Harshal Patel – 73
R Vinay Kumar – 72
Zaheer Khan – 49
Md Siraj – 45
S Aravind – 45 pic.twitter.com/womcLHp3cm— Prithvi (@Prithvi10_) April 19, 2022
हर्षल पटेलने मंगळवारी (दि. २६ एप्रिल) राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी ७१ आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ८.४८च्या इकॉनॉमी रेटने ८७ विकेट्स घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फॅमिली मॅटर झालं नाहीतर गोनी टीम इंडियाचा खरंच लिजंड झाला असता
रवी शास्त्रींचा धक्कादायक खुलासा! म्हणाले, ‘भारतातील जळणाऱ्या लोकांना वाटायचं की, मी…