जेव्हा एखादा खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये नसतो, तेव्हा त्याच्याकडून अनेक चुका घडतात. त्याला अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश येते. असेच काहीसे भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजी फळीचा कणा माणल्या जाणाऱ्या जसप्रीत बुमराह याच्यासोबत घडले होते. बुमराह फॉर्ममध्ये नसल्यामुळे त्याच्याकडून एका डावादरम्यान भरपूर धावा खर्च झाल्या होत्या, त्यामुळे भारतीय संघाचा तत्कालीन कर्णधार विराट कोहली भलताच चिडला होता. त्यावेळी विराटला त्याच्यासोबत बोलायचे होते, परंतु भारताच्या वरिष्ठ खेळाडूने त्याला असे करण्यापासून रोखले होते. काय होता तो किस्सा चला जाणून घेऊया…
ही गोष्ट आहे 2018 सालची. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. वर्षाच्या सुरुवातीच्याच कसोटी संघात त्याला संधी मिळाली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला सामील केले होते. यापूर्वी बुमराहला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील तज्ज्ञ मानले जात होते. त्याने 9 कसोटीत 21च्या सरासरीने 48 विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये 3 वेळा डावात 5 विकेट्स घेण्याच्या कामगिरीचाही समावेश होता. तो भारतााठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही होता. मात्र, एका डावातील खराब कामगिरीमुळे त्याने चाहत्यांचा हिरमोड केला होता.
त्यावेळी ईशांत शर्मा (Ishant Sharma) हाच तो वरिष्ठ खेळाडू होता, ज्याने खूपच लवकर बुमराहतील नेतृत्वगुण ओळखले होते. त्याला याची जाणीव झाली होती की, बुमराह लवकरच भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करू शकतो. ईशांतनेही मान्य केले की, त्याला समजले होते की, बुमराह परिस्थिती ओळखण्याची क्षमता राखतो.
जेव्हा विराट 2018-19मध्ये ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यानच्या एका कसोटी सामन्यात बुमराहच्या खराब कामगिरीवर नाराज झाला होता. त्यावेळी ईशांतने त्याला बुमराहशी बोलण्यापासून रोखले होते.
ईशांतने माध्यमांशी बोलताना म्हटले की, “मला माहिती होते की, एक दिवस येईल, जेव्हा बुमराह एक नेतृत्व करणारा बनेल. मला आठवते की, 2018च्या ऑस्ट्रेलियातील एका कसोटी सामन्यादरम्यान त्याने खराब गोलंदाजी केली होती. विराटने मला म्हटले की, ‘मला वाटते की, मला त्याच्याशी बोलले पाहिजे.’ त्यावेळी मी म्हणालो की, ‘तो खूप हुशार गोलंदाज आहे. त्याला समज आहे. त्याला सोडून दे. त्याला माहिती आहे की, काय करायचे आहे आणि काय नाही करायचे. विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये. त्यामुळे तुम्ही लवकरच पुनरागमन करू शकता.'”
विशेष म्हणजे, बुमराह त्या मालिकेत भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला होता. त्याने चार सामन्यात 21 विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये एका डावात 5 विकेट्सचाही समावेश होता. भारताने ही यादगार ऑस्ट्रेलिया मालिका जिंकली होती. (when indian pacer ishant sharma stopped upset virat kohli to talk with jasprit bumrah)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मुलांना बीपासून सुरू होणाऱ्या कोणत्या गोष्टीची जास्त गरज?’, पोरीचा प्रश्न अन् अश्विनचं भन्नाट उत्तर; वाचा
भारतीय दिग्गजाच्या एकाच ट्वीटने देशभरात माजवली खळबळ; नेटकरी म्हणाले, ‘तुझा आदर आहे, पण तू दलाल…’