बॉलिवूड आणि क्रिकेटमधील संबंध खूप जूने आहेत. परंतु जर कोणी यांची तुलना करायला सांगितले तर खूप कठीण प्रश्न होईल. अशाच प्रकारचा काही प्रश्न भारतीय संघाचा फलंदाज केदार जाधवलाही विचारण्यात आला होता.
जाधवने इंस्टाग्राम लाईव्ह व्हिडिओ सेशनदरम्यान याचे उत्तरही दिले होते.
यादरम्यान जाधवला (Kedar Jadhav) प्रश्न विचारण्यात आला होता की, बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) यांपैकी तुझा आवडता ‘सुपरस्टार’ कोण आहे? यावर प्रत्युत्तर देत जाधवने धोनीचे नाव घेतले. त्याचबरोबर तो म्हणाला की, धोनीमुळेच मला सलमानला भेटण्याची संधी मिळाली होती.
आपल्या कारकीर्दीत ७३ वनडे आणि ९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणारा जाधव म्हणाला की, “माझ्यासाठी दोघेही सुपरस्टार आहेत. मी यांच्यात भेदभाव नाही करू शकत. धोनीमुळेच मला अनेक सामने खेळता आले. तसेच त्याच्यामुळेच मला सलमान भाईला भेटता आले होते. त्यामुळे मला वाटते की, सर्वप्रथम माझा आवडता सुपरस्टार (Superstar) हा माही भाई असेल. त्यानंतर सलमान भाई.”
जाधव पुढे म्हणाला की, सलमान आणि धोनी यांपैकी एकाची निवड करणे म्हणजे आई- वडीलांपैकी एकाची निवड करण्यासारखी आहे. तो म्हणाला की, “माझ्यासाठी हे सांगणे खूप कठीण आहे की, तुम्हाला आई-वडीलांपैकी कोण जास्त आवडते.”
जाधवने पुढे खुलासा करत सांगितले की, देशातील इतर लोकांप्रमाणे त्यानेही सचिन तेंडुलकरला खेळताना पाहिले. परंतु भारतीय क्रिकेटमधील या दिग्गजासोबत ड्रेसिंग रूम शेअर करता आले नाही. त्याने सांगितले की, “जवळपास ९९ टक्के लोकांनी सचिनला पाहुन क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. परंतु मला या गोष्टीचा नेहमी पश्चाताप होईल की, मी भारतासाठी सचिनबरोबर क्रिकेट खेळू शकलो नाही.”
यावेळी ३५ वर्षीय जाधव म्हणाला की, तो जेव्हा पहिल्यांदा धोनीला भेटला होता, तेव्हा त्याला धोनीची भीती वाटत होती. परंतु धोनीच्या शांत स्वभावाचा त्याच्यावर प्रभाव पडला होता.
याबद्दल बोलताना त्याने सांगितले की, “ज्यावेळी मी धोनीला भेटलो होतो, तेव्हा मला असे वाटत होते की, तो भारतीय संघाचा कर्णधार आहे आणि अधिक शिस्तप्रिय आहे. परंतु तो खूप शांत आहे. तसेच खूप गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. परंतु धोनी शांत राहुनही मी त्याला खूप भीत होतो.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-आयपीएलमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेणारे ३ क्रिकेटर्स
-हे ५ आयपीएल विक्रम मोडणं जवळपास अशक्यच
-टीम इंडियात चहलला हवी आहे ओपनिंगची रोहितची जागा