मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताकडून कसोटीमध्ये पदार्पण करणाऱ्या मयांक अगरवालने पहिल्या डावात 76 आणि दुसऱ्या डावात 42 धावांची खेळी करत त्याच्यातील प्रतिभा दाखवून दिली आहे.
पण या सामन्याच्या पहिल्या दिवशी (26 डिसेंबर) तो फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू केरी कीफ यांनी त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच अगवालने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केलेली खेळी कॅटींनमधील कर्मचाऱ्यांच्या किंवा हाॅटेमध्ये काम करणाऱ्या वेटरसोबत केली असल्याचे त्यांनी भाष्य केले होते.
याबद्दल आता भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केरी कीफ यांना उत्तर देताना म्हटले आहे की ‘तू जेव्हा तूझे कँटीन चालू करशील तेव्हा अगरवाल तिथे येऊन कॉफीचा वास घेऊ इच्छित आहे आणि याची तूलना त्याला येथील आणि भारतातील कॉफीशी करायची आहे, तूझ्या कँटीनमधील कॉफी चांगली आहे की भारतातीलच चांगली आहे?’
शास्त्रींच्या या उत्तराला ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज शेन वॉर्नने हसून दाद दिली आहे.
या सामन्यात जेव्हा अगरवालने 76 धावांची खेळी केली त्यानंतर फॉक्स क्रिकेटसाठी समालोचन करत असलेले केरी कीफ यांनी माफी मागतली असून त्यांनी म्हटले आहे की ‘मी अगरवालच्या भारतात केलेल्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या धावांबद्दल बोलत होतो. ज्यावर या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.’
‘मी कोणत्याही प्रकारे त्याच्या स्थराला कमी मानत नाही. त्याने बऱ्याच धावा केल्या आहेत. त्यामुळे कोणालाही वाईट वाटले असेल तर मी माफी मागतो.’
या सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित केला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 151 धावांवर संपुष्टात आला. या डावात भारताकडून जसप्रीत बुमराहने 6 विकेट्स घेतल्या.
यानंतर भारताने 8 बाद 106 धावांवर दुसरा डाव घोषित करुन ऑस्ट्रेलियासमोर पहिल्या डावातील 292 धावांच्या आघाडीसह 399 धावांचे विजयासाठी आव्हान ठेवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–मेलबर्न कसोटीत खेळत असेल्या खेळाडूच्या भावाला अटक
–रिषभ पंतने केला टीम पेनचा कालचा हिशोब चुकता, पहा व्हिडीओ
–जगातील सर्वच कर्णधारांसाठी हे वर्ष ठरले अतिशय खराब