चेन्नई। आयपीएल 2019मध्ये बुधवारी(1 मे) एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडलेल्या सामन्यात चेन्नईने 80 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
त्याने प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई संघाकडून 22 चेंडूत 44 धावा केल्या. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले. या तीन षटकारातील एक षटकार मारताना धोनीच्या एका हाताची बॅटवरील पकडही निसटली होती.
हा षटकार धोनीने 19 व्या षटकात दिल्लीचा गोलंदाज ख्रिस मॉरिसने शेवटचा चेंडू टाकताना बिमर पडलेल्या चेंडूवर मारला. यावेळी मॉरिसच्या हातून चूकून बिमर पडलेल्या या चेंडूवर धोनीने स्वत:चा बचाव करताना बॅट जोरात फिरवली. त्यामुळे हा चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. पण यावेळी त्याच्या बॅटवरील एका हाताची पकट निसटली होती.
या चेंडूनंतर मॉरिसने लगेचच येऊन धोनीची माफी मागितली. या चेंडूला पंचानी नो बॉल घोषित केले त्यामुळे चेन्नईला एक चेंडू ज्यादाचा मिळून फ्रिहीटही मिळाली. या फ्रि हीटवर धोनीने एक धाव काढली.
M50: CSK vs DC – MS Dhoni Six https://t.co/VahiyWFVpO via @ipl
— gujjubhai (@gujjubhai17) May 1, 2019
या सामन्यात धोनीने फलंदाजीबरोबरच यष्टीरक्षणातही चांगली कामगिरी केली. त्याने यष्टीरक्षण करताना 2 यष्टीचीत केले आणि 1 झेल घेतला. चेन्नईने या सामन्यात धोनीने केलेल्या 44 धावांच्या खेळीच्या आणि सुरेश रैनाने केलेल्या 59 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 179 धावा केल्या.
हैद्राबादकडून गोलंदाजीत जगदीशन सुचितने सर्वाधिक 2 विकेट्स, तर ख्रिस मॉरिस आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक विकेट घेतली.
त्यानंतर 180 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्लीचा ड़ाव 16.2 षटकातच 99 धावांवर संपुष्टात आला. दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यरने एकाकी झूंज दिली. त्याने 31 चेंडूत 44 धावा केल्या. पण अन्य फलंदाज चेन्नईच्या फिरकी गोलंदाजीपुढे टीकाव धरु शकले नाही.
चेन्नईकडून गोलंदाजीत इम्रान ताहीरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच जडेजाने 3 विकेट्स, तर दिपक चहर आणि हरभजन सिंगने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
डेविलियर्सनेही मारला एका हाताने षटकार –
आयपीएल2019मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात पार पडलेल्या 42 व्या सामन्यात डेविलियर्सने असाच एका हाताने षटकार मारला होता. हा षटकार थेट स्टेडियमच्या छतावर गेला होता.
या सामन्यात 19 व्या षटकात पंजाबच्या मोहम्मद शमीने पाचवा चेंडू फुलटॉस टाकला. कंबरेच्या उंचीएवढ्या आलेल्या या चेंडूवरुन डिविलियर्सने नजर हटवली. पण त्याने जोरात बॅट फिरवल्याने तो चेंडू थेट स्टेडियमच्या छतावर गेला. यावेळी डिविलियर्सच्याही एक हाताची बॅटवरील पकडही निसटली होती.
— VINEET SINGH (@amit9761592734) May 1, 2019
महत्त्वाच्या बातम्या –
–काॅईन जमीनीवर फिरतोय, तरीही सीएसकेने टाॅस जिंकल्याचे रेफ्रीने केले जाहीर, पहा व्हिडिओ
–रैनाने रचला इतिहास, दिल्ली विरुद्धच्या सामन्यात केले तीन खास विक्रम
–ताहीरच्या सेलिब्रशनमध्ये सामील न होण्यामागच्या कारणाचा धोनीने केला खुलासा, पहा व्हिडिओ