भारताचे माजी सलामीवीर आणि सध्या प्रसिद्ध हिंदी समालोचक असलेले आकाश चोप्रा यांची क्रिकेट कारकीर्द खूपच लहान होती. साल 2003 मध्ये पदार्पण केलेल्या आकाश चोप्रा यांनी 2004 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात त्यांची कामगिरी खूपच खराब होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने आपल्या पहिल्याच षटकात चोप्रा यांना बाद केले होते. सध्या त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
आकाश चोप्रा यांनी 2003-04 साली ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठीमध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केले. या दौर्यावरील त्यांच्या उपयुक्त कामगिरीमुळे 2004 साली ऑस्ट्रेलियन संघ भारतात आला तेव्हा चोप्रा यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात विरेंद्र सेहवागबरोबर भारतीय डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या चोप्रा यांना ग्लेन मॅकग्राने बाद केले.
पहिल्या डावातील पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर आकाश चोप्रा शून्यावर बाद झाले. त्यांनी बाद होण्यापूर्वी २ निर्धाव चेंडू खेळले होते.
The day Aakash Chopra tried to bat against Glenn McGrath
Should've stayed at home pic.twitter.com/ThXDk2OFD7
— Rob Moody (@robelinda2) May 12, 2021
विशेष म्हणजे आकाश चोप्रा यांची प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्द शानदार आहे, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांना जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. एकदा आकाश चोप्रा यांनी स्वत: मान्य केले होते की जेसन गिलेस्पी, शोएब अख्तर, ब्रेट ली आणि ग्लेन मॅकग्रा यांची गोलंदाजी खेळने त्यांच्यासाठी सर्वात कठीण होते.
दरम्यान या सामन्याबद्दल विचार केला असता, रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने भारताचा पराभव करत सामना आपल्या नावावर केला होता. मायकेल क्लार्कच्या 151 आणि अॅडम गिलक्रिस्ट याच्या 104 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 474 धावांचा मोठा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरादाखल भारताचा पहिला डाव केवळ 246 धावांवर बाद झाला. सामन्यातील शेवटच्या डावात भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी 457 धावांचे विशाल काय लक्ष्य देण्यात आले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना राहुल द्रविडनी 60 व इरफान पठाणने 55 धावांची खेळी केली. मात्र इतर फलंदाजांकडून पुरेशी साथ न मिळाल्यामुळे भारतीय संघाला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटचे मैदान गाजवायला सज्ज झाला मोहम्मद शमीचा भाऊ, पहा धारदार गोलंदाजीचा व्हिडिओ
पृथ्वी शॉची फलंदाजी पाहून माजी भारतीय क्रिकेटपटू झाला भलताच खुश; केली ‘ही’ मागणी






